PMC Encroachment Action | वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई

Homeadministrative

PMC Encroachment Action | वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई

Ganesh Kumar Mule Feb 27, 2026 9:17 PM

Bharat Bandh 2022 | उद्या भारत बंद!  | कुणी आणि कशासाठी पुकारला? जाणून घ्या! 
Ajit Pawar | माध्यमांनी विनाकारण बदनामी करणे थांबवावे | खात्री करुनच यापुढे माध्यमांनी बातम्या द्याव्यात | विरोधी पक्षनेते अजित पवार
Maval Shree Bodybuilding Competetion | पाचव्या वर्षातील मावळ श्री चा शिलेदार ठरला विनोद कागडे!

PMC Encroachment Action | वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत काल अतिक्रमण निर्मूलन विभाग, परिमंडळ ३ यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत नदी पात्र, कर्वेनगर डीपी रोड येथे अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. अशी माहिती अतिक्रमण निरीक्षक  मंदार राजकुमार करंजे यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

या कारवाई वेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, बिगारी सेवक, अतिक्रमण निरीक्षक मंदार राजकुमार करंजे, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक  प्रतिक सानप,  माधव बहिरम, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक  मंथन आमले,  आकांक्षा खोडे धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण विभागाची मदत झाली. यामध्ये ५ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये, लोखंडी जाळ्या,हातगाड्या,, सिलेंडर, पथारी, टेबल, खुर्ची,  व्यावसायिक वाहन व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग उप आयुक्त सोमनाथ बनकर, मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार, महापालिका सहाय्यक आयुक्त  अस्मिता तांबे/धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली. अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील वारंवार व नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक  मंदार राजकुमार करंजे यांनी सांगितले.

कारवाई तपशील : 

हातगाडी – ९
इतर – २०
सिलेंडर – २२
पथारी – ४६
लोखंडी जाळ्या  – १०

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0