Pune Water Issue | असमान पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांसोबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय  बैठका घेत एका महिन्यात अहवाल द्या | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना

Homeadministrative

Pune Water Issue | असमान पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांसोबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय  बैठका घेत एका महिन्यात अहवाल द्या | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना

Ganesh Kumar Mule Feb 26, 2026 8:09 PM

Pune Rain | पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली | पाणीपुरवठा करणारी धरणे ९७% भरली 
Maharashtra Vidhansabha Election | २३ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात परिवर्तन दिवस !- मोहन जोशी
Shivsena UBT on Sinhgadh Road Flyover | सिंहगड रोड उड्डाणपूल सुरू करण्यासाठी शिवसेनेचे आगळेवेगळे आंदोलन

Pune Water Issue | असमान पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांसोबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय  बैठका घेत एका महिन्यात अहवाल द्या

| स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – ​शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्व नगरसेवकांशी चर्चा करून पाणीपुरवठ्यातील अडचणी, समस्या व त्रुटींचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. (Shrinath Bhimale Chairman Standing Committee)

स्थायी समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भिमाले यांनी ही माहिती दिली. ‘नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध भागातील नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या होत्या. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी द्यावे लागत आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असताना पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी का येत आहेत, यात नेमक्या कोणत्या समस्या आहेत, त्या दूर का झाल्या नाहीत, याचा आढावा घेण्याची सूचना पाणीपुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप यांना केली आहे,’असे भिमाले यांनी सांगितले.

‘पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जाऊन तेथील सर्व नगरसेवकांसोबत सविस्तर बैठक घ्यावी. नेमकी परिस्थिती, अडचणी समजून घ्याव्यात. त्याचा सविस्तर अहवाल तयार करून स्थायी समितीसमोर सादर करावा. येत्या आठ ते दहा दिवसात सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील बैठका पूर्ण कराव्यात,’अशी सूचना केल्याचे भिमाले यांनी सांगितले. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रकही तयार केल्याचे भिमाले यांनी नमूद केले.

——

‘सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाणीप्रश्नाबाबत आठ ते दहा दिवसात बैठका पार पडतील. त्यानंतर तातडीने त्याचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानुसार आवश्यक उपाययोजना केल्या जातील,’.

श्रीनाथ भिमाले. अध्यक्ष, स्थायी समिती

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0