National Mission for Mentoring | डॉ. राहुल पाटील यांची ‘नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग’मध्ये निवड

Homeadministrative

National Mission for Mentoring | डॉ. राहुल पाटील यांची ‘नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग’मध्ये निवड

Ganesh Kumar Mule Feb 24, 2026 8:59 PM

Nagar Road BRTS | नगर रस्ता सिग्नल फ्री करणार |आमदार सुनिल टिंगरे
  ‘Wakeup Punekar’ public movement to solve the problems of Punekar | ‘Stuck Punekar’ campaign to break the traffic jam
Mohan Joshi Pune Congress | भाजपला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात ‘भोपळा’च! | माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

National Mission for Mentoring | डॉ. राहुल पाटील यांची ‘नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग’मध्ये निवड

 

Otur News – (The Karbhari News Service) – भारत सरकारच्या ‘नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन’ (NCTE) आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग’ (NMM) मध्ये मार्गदर्शक (Mentor) म्हणून डॉ. राहुल प्रतापसिंग पाटील यांची निवड झाली आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ.रमेश शिरसाट व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.वसंत गावडे यांनी दिली. (Pune Breaking News)

डॉ. पाटील हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (PDEA) अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, ओतूर (ता. जुन्नर) येथे कार्यरत आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, देशभरातील शालेय शिक्षकांना उच्च दर्जाचे शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचा एक राष्ट्रीय संच (National Pool) तयार करण्यात येत आहे. या महत्त्वाच्या मोहिमेसाठी डॉ. पाटील यांच्या अनुभवाचा आणि शैक्षणिक योगदानाचा विचार करून त्यांची निवड करण्यात आली आहे.

डिजिटल पोर्टलद्वारे मिळणार मार्गदर्शन

या निवडीमुळे डॉ. पाटील आता राष्ट्रीय स्तरावरील NMM ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील शिक्षकांशी जोडले जातील. ते शिक्षकांना अध्यापन पद्धती, शैक्षणिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे, ही मोहीम शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि शिक्षकांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

ग्रामीण भागातील महाविद्यालयाचा गौरव

डॉ.पाटील यांच्या या निवडीमुळे PDEA संस्था आणि जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसराच्या शैक्षणिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे. अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या नावाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या राष्ट्रीय स्तरावरील गौरवाबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री माननीय. सुनेत्राताई पवार, उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम,खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, सहसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए.एम.जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट ,उपप्राचार्य डॉ कल्याण सोनावणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व्यक्त केले असून, हे यश संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला मिळालेली राष्ट्रीय ओळख असल्याचे प्राचार्य डॉ.रमेश शिरसाट यांनी गौरवोद्गार काढले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: