Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता! | विरोधी पक्षाकडून कुणाचाही अर्ज नाही 

Homeadministrative

Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता! | विरोधी पक्षाकडून कुणाचाही अर्ज नाही 

Ganesh Kumar Mule Feb 23, 2026 7:35 PM

PMC Election Ward 4 | प्रभाग क्रमांक ४ अ मधून माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांचा जोर | काम आणि स्वतःची प्रतिमा हा ठरणार करिष्मा 
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असाही संवेदनशीलपणा!
PMC Contract Employees Bonus | बोनस मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार | कामगार नेते सुनील शिंदे

Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता! | विरोधी पक्षाकडून कुणाचाही अर्ज नाही

 

PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती व नाव समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी २३ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ६ अर्ज स्वीकारले गेले. मात्र या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कारण विरोधी पक्षाकडून कुणाचेही अर्ज भरले गेले नाहीत. फक्त भाजप कडून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात आले आहेत. अशी माहिती नगरसचिव कार्यालयाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी २३ फेब्रुवारीला निवडणूक झाली. त्यानंतर आता विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. त्यासाठी ही निवडणूक होणार आहे.

त्यानुसार  अध्यक्ष व उपाध्यक्ष  यांची निवडणूक विभागीय आयुक्त यांचे आदेशानुसार शुक्रवार  २७ फेब्रुवारी  रोजी होणार आहे.

अशा होतील निवडणुका

विधी समिती | सकाळी ११:३०

शहर सुधारणा समिती | सकाळी १२:००

महिला व बाल कल्याण समिती | दुपारी १२:३०

क्रीडा समिती | दुपारी १:००

शिक्षण समिती | दुपारी १:३०

नाव समिती | दुपारी २:००

या समित्यांच्या बैठकीत या निवडणुका होतील.  यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून  दीपा मुधोळ-मुंढे, आयुक्त समाजकल्याण विभाग, पुणे यांची नेमणूक केली आहे.

यासाठी नामनिर्देशित पत्र स्विकारण्याचा दिवस सोमवार २३ फेब्रुवारी रोजी वेळ दुपारी ३:०० ते ६:०० वाजता निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार फक्त भाजप कडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विरोधी पक्षाकडून अर्ज दाखल झाले नाहीत. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होती. असे मानले जात आहे.

दरम्यान या सर्व समिती मध्ये १३ सदस्य असणार आहेत. यामध्ये भाजप १०, राष्ट्रवादी कॉंग्रेस २ आणि कॉंग्रेस च्या १ सदस्याचा समावेश आहे.

 

| असे असतील संभाव्य अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

 

१. विधी समिती  |  अध्यक्ष – स्वरदा बापट  |  उपाध्यक्ष – पायल तुपे

२. शहर सुधारणा समिती | अध्यक्ष – स्मिता वस्ते  | उपाध्यक्ष – सपना छाजेड

३. महिला व बाल कल्याण समिती | अध्यक्ष – अल्पना वरपे | उपाध्यक्ष – तन्वी दिवेकर

४. क्रीडा समिती | अध्यक्ष – नारायण गलांडे | उपाध्यक्ष – दिनेश माथवड

५. शिक्षण समिती | अध्यक्ष – अरुण राजवाडे | उपाध्यक्ष – अतुल तरवडे

६. नाव समिती | अध्यक्ष – पल्लवी जावळे | उपाध्यक्ष – सुनील पांडे

————

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0