Pune Shivsena Agitation Against Rahul Gandhi | आंतरराष्ट्रीय ए.आय. समिटमध्ये देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींनी तत्काळ माफी मागावी – प्रमोद नाना भानगिरे

HomeBreaking News

Pune Shivsena Agitation Against Rahul Gandhi | आंतरराष्ट्रीय ए.आय. समिटमध्ये देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींनी तत्काळ माफी मागावी – प्रमोद नाना भानगिरे

Ganesh Kumar Mule Feb 21, 2026 8:01 PM

PMC Sky Sign Policy | जाहिरात शुल्क सुधारित करण्याबाबतचे दोन प्रस्ताव  मागे घेण्यास मुख्य सभेची मान्यता | कॉंग्रेस ने दर्शवला विरोध 
Hemant Bagul | ‘टीडीआर’ च्या इत्यंभूत नोंदींसाठी ‘  डिजिटायझेशन’ ठोस पर्याय
PMC Pune Recruitment Second Phase | महापालिका भरती दुसरा टप्पा | दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी विधान भवनाचा अडसर! | रोस्टर तपासण्यात होतोय विलंब

Pune Shivsena on Rahul Gandhi | आंतरराष्ट्रीय ए.आय. समिटमध्ये देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींनी तत्काळ माफी मागावी – प्रमोद नाना भानगिरे

| पुण्यात राहुल गांधीं विरोधात शिवसेनेचे तीव्र निदर्शने

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – नवी दिल्ली येथे पार पडत असलेल्या आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल साऊथ ए.आय. समिट’दरम्यान भारतीय युवक काँग्रेसच्या कथित आंदोलनामुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन झाल्याचा तीव्र आरोप करत शिवसेना पुणे शहराच्या वतीने आज सारसबागेसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. जगभरातील मान्यवर प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि तज्ज्ञ उपस्थित असताना देशांतर्गत राजकारणासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे हा राष्ट्राच्या सन्मानावर घाला असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. (Pune Breaking News)

या परिषदेला विविध देशांतील प्रतिनिधी उपस्थित असून भारताने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व सिद्ध करण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या विषयावर जगभर चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी केलेली कृती ही राजकीय स्टंटबाजी असून देशहितापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देण्याचे द्योतक असल्याचे शिवसेनेचे मत आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची सकारात्मक प्रतिमा उंचावण्याऐवजी तिला धक्का देण्याचा प्रयत्न हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याचे भानगिरे म्हणाले. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या निषेध आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ‘भारत-अमेरिका व्यापार करार’ संदर्भात बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वापरलेला ‘कॉम्प्रमाईज्ड’ हा शब्द देशाच्या सर्वोच्च पदाचा अवमान असून देशाच्या राष्ट्रीय पक्ष असलेल्या व विधिमंडळातील विरोधी पक्षनेत्याने व्यक्तीगत द्वेषातून अशा प्रकारची भाषा वापरणे हे लोकशाहीच्या परंपरेला शोभणारे नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भारताच्या भूमिकेलाच कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे शिवसेनेने नमूद केले.

या आंदोलनावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय युवक काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी, अन्यथा अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना पुकारेल यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माजी उपमहापौर आबा बागुल, युवासेना सचिव किरण साळी, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, उपजिल्हा संघटक पंकज कोद्रे ,युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, सोमनाथ कुटे,युवासेना शहर प्रमुख निलेश गिरमे, सुदर्शना त्रिगुनाईत,उपशहर प्रमुख दत्ता खवळे, सुहास पडवळ,संजय डोंगरे,विकी माने,प्रमोद प्रभुणे, संतोष लांडगे,सुधीर कुरुमकर,नवनाथ निवंगुणे, दीपक कुलाळ,प्रवीण हेलगे, अक्षय टकले,महेंद्र जोशी,अक्षय तारू,संतोष जाधव,संदेश पावसकर, अनिकेत सपकाळ,विशाल पवार, अश्विनी मल्हारी, शंतनु सरकार व अनेक पदाधिकारी उपस्थित होते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: