PMC Sky Sign Policy | जाहिरात शुल्क सुधारित करण्याबाबतचे दोन प्रस्ताव  मागे घेण्यास मुख्य सभेची मान्यता | कॉंग्रेस ने दर्शवला विरोध 

HomeBreaking News

PMC Sky Sign Policy | जाहिरात शुल्क सुधारित करण्याबाबतचे दोन प्रस्ताव  मागे घेण्यास मुख्य सभेची मान्यता | कॉंग्रेस ने दर्शवला विरोध 

Ganesh Kumar Mule Feb 18, 2026 10:08 PM

PMC Chief Engineer | मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीने नंदकिशोर जगताप यांची केलेली शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप
Harshwardhan Sapkal | महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का? राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा | हर्षवर्धन सपकाळ
SKADA system | पथ विभाग निविदा वाद | स्काडा यंत्रणेशिवाय काम केल्याचा आरोप | अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची अरविंद शिंदे यांची मागणी

PMC Sky Sign Policy | जाहिरात शुल्क सुधारित करण्याबाबतचे दोन प्रस्ताव  मागे घेण्यास मुख्य सभेची मान्यता | कॉंग्रेस ने दर्शवला विरोध

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेने शहरातील जाहिरात फलकाचे परवाना शुल्क सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार नवीन दर ठरवण्यात आले आहेत. याबाबतचे दोन प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मुख्य सभे समोर ठेवले होते. मात्र या प्रस्तावांना होत असलेला विरोध पाहून प्रशासनाने मुख्य सभेसमोर ठेवलेले हे दोन्ही प्रस्ताव मागे घेण्याबाबत उपसूचना दिली होती. याला आजच्या मुख्य सभेत मान्यता देण्यात आली.   (Pune Municipal Corporation -PMC)

| हे आहेत मागे घेतलेले प्रस्ताव

| जाहिरात फलक साठी 2023 ते 26 साठी 580 तर 2026 ते 29 सालापर्यंत 700 रु दर
पुणे महापालिकेने शहरातील जाहिरात फलकाचे परवाना शुल्क सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार नवीन दर ठरवण्यात आले आहेत. आता हे दर २२२ रुपये प्रति चौरस फुटावरून ५८० ते ७०० इतका असणार आहे. पहिला प्रस्ताव हा जाहिरात फलकासाठी वर्ष २०२३ ते २०२६ साठी ५८० रु इतका दर असणार हा होता. तर दुसरा प्रस्ताव २०२६ ते २०२९ सालासाठी ७०० रु असा दर असणार हा होता. हे दोन्ही प्रस्ताव मागे घेण्यात आले आहेत.

| न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून दुरुस्ती करावी लागणार – कॉंग्रेस

दरम्यान प्रशासनाचे विषयपत्र मागे घेण्यास मुख्य सभेत कॉंग्रेस कडून विरोध दर्शवण्यात आला. कॉंग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे आणि प्रशांत जगताप यांनी  आपला विरोध दर्शवला. अरविंद शिंदे म्हणाले,  हे दोन्ही प्रस्ताव का मागे घेतले याबाबत स्पष्टीकरण देताना प्रशासनाने म्हटल आहे कि, या विषय पत्रात काही बाबींमध्ये तांत्रिक व प्रशासकीय स्वरूपाच्या दुरुस्त्या करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे. काय तांत्रिक अडचण आहे, हे  आयुक्तांनाच माहित आहे. मात्र दुरुस्ती करत असताना उच्च न्यायालाच्या निर्णयाच्या अधीन राहून करावी लागणार आहे. अशी दुरुस्ती करता येणार नाही. न्यायालयाने ५८०, ६४० आणि ७०० रुपये दरास मान्यता दिली होती. यानुसार दुरुस्ती करावी लागणार आहे. याशिवाय दुसरी कुठली दुरुस्ती करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही.

दरम्यान कॉंग्रेसचा विरोध मोडून काढत दोन्ही प्रस्ताव मान्य करण्यात आले.

| दंडाच्या प्रस्तावावर पुढील सभेत होणार चर्चा

पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक जांगावर अनधिकृतपणे बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, इ. वर क्षेत्रिय कार्यालयामार्फत दैनंदिन स्वरूपात निष्कासन कारवाई करण्यात येते. महापालिका प्रशासनाच्या वतीने अनधिकृत बोर्ड, फ्लेक्स साठी १ हजार दंड घेतला जातो. तर अनधिकृत जाहिरात फलक निष्काचीत करण्यासाठी ५० हजार शुल्क घेतले जाते. मात्र आता या दंडात आणि शुल्कात वाढ करण्यात आली आहे. अनधिकृत फ्लेक्स साठी आता १० हजार दंड आणि निष्काचन शुल्क हे २ लाख इतके वाढवण्यात आले आहे. हा प्रस्ताव देखील आजच्या मुख्य सभेसमोर होता. मात्र यावर चर्चा झाली नाही. हा विषय पुढे ढकलण्यात आला आहे. यावर आता आगामी सभेत चर्चा होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: