BodyBuilding Competetion | जिल्हास्तरीय 16वी अरण्येश्वर पुणे श्री स्पर्धेचे निकाल घोषित 

Homeadministrative

BodyBuilding Competetion | जिल्हास्तरीय 16वी अरण्येश्वर पुणे श्री स्पर्धेचे निकाल घोषित 

Ganesh Kumar Mule Jan 27, 2026 8:50 PM

Pramod Nana Bhangire | प्रमोद नाना भानगिरे, पुणे महापालिका आयुक्तांसमवेत भर पावसात थेट एकता नगर मध्ये दाखल! 
Vetal Tekdi | MP Supriya Sule | वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार |खासदार सुप्रिया सुळे 
 Pune Potholes | रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल | शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा इशारा

BodyBuilding Competetion | जिल्हास्तरीय 16वी अरण्येश्वर पुणे श्री स्पर्धेचे निकाल घोषित

 

Pune News – (The Karbhari News Service) –  पुणे जिल्हास्तरीय 16वी अरण्येश्वर पुणे श्री 2026 ही स्पर्धा अरण्येश्वर चौक, पुणे या ठिकाणी 77व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य राखून पार पाडण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन मा उमाकांत गायकवाड, मा राजेंद्रभाऊ गायकवाड यांनी उत्कर्ष युवा प्रतिष्ठान पुणे व बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांच्या संलग्नतेने केले होते. या स्पर्धेतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वूमन फिटनेस या महिला गटामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिलांनी सहभाग घेतला होता व स्पर्धा पाहण्यासाठी महिलांची गर्दी विशेष होती. (Bodybuilding)

बालगोपाळांचा स्पर्धेमध्ये सहभाग त्यांची आकर्षक पोझिंग यामध्ये शर्वर सुर्वे, मोक्ष शिंदे व शौर्य भोर यांनी विशेष बाजी मारली.
अक्षय शिंदे, मिलिंद खर्चने व अनिकेत राजगुरु यांच्यातील अतितटीच्या झालेल्या सामन्यात अरण्येश्वर पुणे श्री 2026 चा मानकरी एम्स फिटनेस जिमचा अनिकेत राजगुरू ठरला.

महिला गटातून आर बाउन्स फिटनेसची स्नेहल ठाकूर हिने मिस वुमन फिटनेस हा किताब जिंकला.
या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी ऋषिकेश भोसले, मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा मानकरी मिलिंद खर्चने व अपकमिंग बॉडी बिल्डरचा मानकरी अक्षय शिंदे ठरला.
पुणे जिल्ह्यातील 180 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी हे या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण ठरले.
या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, अविनाश बागवे,  जयराज दादा लांडगे,  शरद मारणे, जनरल सेक्रेटरी  अजय गोळे,  मिनाक्षी ठाकूर,  राजेश वाईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये पंच म्हणून मंदार चवरकर, राम बराटे, प्रमोद नाईक, युनुस काझी, संग्राम पवार, विकास पाटील, कौस्तुभ शेडगे, गिरीश सर, विशाल मोहिते, ओंकार शेवकर ,शरद तिवारी, उमेश मोहतकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

वुमन क्लासिक
पहिला क्रमांक स्नेहल ठाकूर, दुसरा क्रमांक शितल वाडेकर, तिसरा क्रमांक यशोदा भोर,चौथा क्रमांक प्रतिमा कांबळे,

55 किलो गट
1 निलेश गजमल, 2 मोहीन बेपारी, 3 समीर साठे, 4 सोमनाथ पाल, 5 सुरज सरोज, 6 तेजस फासगे, 7 अक्षय तांदळे, 8 महेश पाटोळे.

60 किलो गट
1 अर्जुन देडे, 2 अमोल यमदे, 3 दर्शन जाधव, 4 इब्रान अन्सारी, 5 गौरव भरणे, 6 सोहिल वाड, 7 साहिल अली, 8 विजय पांचाळ.

65 किलो गट
1 विनायक कलरीकंडी, 2 संदीप तिवडे, 3 सैफ खान, 4 मोहसीन शेख, 5 प्रतीक पाटील, 6 सचिन वाघ, 7 प्रतीक देटे, 8 रोहित सूर्यवंशी.

70 किलो गट
1 शुभम नखाते, 2 अजय रक्ताटे, 3 अमन सय्यद, 4 शुभम सोनुरे, 5 अक्षय गायकवाड, 6 शुभम मिसाळ, 7 राहुल महादे, 8 शितल बाबर.

75 किलो गट
1 अनिकेत राजगुरू 2 अरबाज शेख 3 मयूर कानसकर 4 शिरीष देसाई 5 आयुष साळुंके 6 ऋषिकेश भोसले 7 ऋषिकेश बेलमकर 8 संकेत असवले

80 किलो गट
1 मिलिंद खर्चाने 2 ओंकार नलावडे 3 विनोद कागडे 4 उदय ननावरे 5 अजित तावरे 6 प्रथमेश कुंभारकर 7 चंद्रजीत टरले 8 चांगदेव सायकर

80 किलो वरील गट
1 अक्षय शिंदे, 2 प्रदीप शिरसागर, 3 फिरोज शेख, 4 संदेश नलावडे, 5 संदेश ओझगीर 6 शुभम गिरी 7 गणेश ठेंगळ 8 भरत चव्हाण

या स्पर्धेचे सूत्रसंचालन किरण जाधव व अतुल राऊत यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: