Navale Bridge News | नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी नवीन भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन   | पुणे महापालिका, पोलीस, RTO, NHAI, PMRDA यांच्यातील बैठकीत निर्णय

HomeBreaking News

Navale Bridge News | नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी नवीन भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन  | पुणे महापालिका, पोलीस, RTO, NHAI, PMRDA यांच्यातील बैठकीत निर्णय

Ganesh Kumar Mule Nov 14, 2025 9:05 PM

Maharashtra Budget 2025-26 | दिशाही नाही, दृष्टीही नाही – हा अर्थसंकल्प तरुणांच्या भविष्यावर अन्याय करणारा आहे! – प्रथमेश आबनावे
Dr Shashi Tharoor Pune Tour |नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर
Pune News | टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाही!

Navale Bridge News | नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी नवीन भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन

| पुणे महापालिका, पोलीस, RTO, NHAI, PMRDA यांच्यातील बैठकीत निर्णय

 

Pune News – (The Karbhari News Service) – नवले पुलावरील अपघात कमी करण्याबाबत आज पुणे महापालिका, पोलीस, RTO, NHAI, PMRDA यांच्यात  बैठक झाली. यात अपघात कमी करण्याबाबत विविध अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. नवीन भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच कुठल्या विभागाने काय कामे करायची, याचे नियोजन देखील या बैठकीत करण्यात आले आहे. (Pune PMC News)

 

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने करण्याची कामे 

१. जांभूळवाडी ते नवले उड्डाणपूल या दरम्यानच्या रस्त्यावर चेक पोस्ट उभारणे तसेच विविध भाषांमध्ये वाहन राजमार्ग प्राधिकरण चालकांना सूचना ( वाहने सावकाश चालवा, वाहने न्यूट्रल करुन चालवू नये. वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, पुढे अपघातप्रवण क्षेत्र व त्रीव उताराचा रस्ता आहे, पुढे शहर आहे ५०० मी., ३०० मी., १०० मी.) देणेसाठी सूचना  फलक उभारावे.
२. जांभूळवाडी टनेल ते स्वामीनारायण मंदिर या रस्त्यावर  मोठ्या आकाराचे LED सूचनाफलक प्रत्येक ५०० मी. अंतरावर लावावेत.

३. जांभूळवाडी टनेल ते स्वामीनारायण मंदिर या दरम्यान भारतीय राष्ट्रीय च्या रस्त्यावर १५ एम. एम. जाडी पर्यंतचे थर्मोप्लास्ट राजमार्ग प्राधिकरण रम्ब्लर पेंट मारणे तसेच ३M कंपनीचे कॅट आईज दर ५०० र.मि. अंतराने बसविणेत यावे. सदर काम एक महिन्याच्या मुदतीत पूर्ण करण्यात यावे.

४. नवले पूलावरून पुणे शहरात ये जा करणाऱ्या वाहनांसाठी  वडगाव पूला लगतची पाटबंधारे विभागाची जागा उपलब्ध करून घेवून राष्ट्रीय महामार्गाशी जोडावी.
५.  वारजे येथील मुठा नदीवर कार्यान्वित असलेल्या पुलाचे  बांधकाम पूर्ण करून मार्च २०२६ अखेर वाहतुकीसाठी राजमार्ग प्राधिकरण खुला करण्यात यावा.

६. भूमकर भुयारी मार्गाच्या लगत प्राधान्याने तसेच विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार नवीन भुयारी मार्गाचे बांधकाम राजमार्ग प्राधिकरण करण्यात यावे.
७. जांभूळवाडी ते सुतारवाडी – पाषाण या दरम्यानच्या  महामार्गावर १६.४० कि.मी. लांबीचे नवीन उड्डाणपुलाचे  बांधकाम ६ मार्गीकेसह काम सुरु करण्याचे नियोजन करण्यात यावे.


पोलीस वाहतूक विभाग

१. भुमकर भुयारी मार्ग ते नवले पूल या दरम्यान रस्त्याच्या  दुतर्फा तसेच वडगाव सेवा रस्त्याच्या दुतर्फा थांबणाऱ्या रिक्षा, ट्रॅव्हल्स बसेस, ट्रक ई. वाहनांवर दैनंदिन कारवाई
करण्यात यावी.

२. जड वाहनांना कमी रहदारीच्या कालावधीमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रवेश देण्याबाबत विचार करण्यात यावा.

 


राजमार्ग प्राधिकरण व पोलीस वाहतूक विभाग

१. जड वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्त्याच्या कडेला स्वतंत्र मार्गिका राखीव ठेवणे व वेग मर्यादा ६० वरून ४० कि.मी. प्रति तास ठेवणे.
२. वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी सध्याच्या रस्त्याची रुंदी कमी करून उर्वरित रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर बॅरिकेट्स उभारण्यात यावे.

३. जांभूळवाडी ते नवले उड्डाणपूल या दरम्यानच्या रस्त्यावर स्पीडगनची संख्या वाढवून जास्त वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी.


प्रादेशिक परिवहन विभाग

१. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर खेड शिवापूर येथे चेक पोस्ट उभारावा. तसेच वाहन चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्ह ची तपासणी करावी. वाहन चालकाने वाहने न्यूट्रल करून चालवू नये यासाठी त्यांचे प्रबोधन करावे.

——–

PMRDA

१. नवले उड्डाण पूल ते भूमकर भुयारी मार्ग दरम्यान दुतर्फा पुणे महानगर क्षेत्र असलेल्या सेवा रस्त्यांसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी विकास प्राधिकरण संबंधित विभागांशी समन्वय साधून रस्त्याची आखणी पुढील ७ दिवसात करावी.

२. नवले उड्डाण पूल ते जांभूवाडी या दरम्यानच्या दुतर्फा पुणे महानगर क्षेत्र असलेल्या सेवा रस्त्यांसाठी आवश्यक असणारी जागा विकास प्राधिकरण ताब्यात घेण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून रस्त्याची मोजणी व जागा टीडीआर पोटी ताब्यात घेण्याची कार्यवाही पुढील ६ महिन्यात करावी.

– —-

पुणे महापालिका 

१. राधा हॉटेल ते सुसखिंड, डुक्कर खिंड ते वारजे येथील मुठा  नदी, वडगाव ते नवले पूल या दरम्यानच्या दुतर्फा असलेल्या सेवा रस्त्यांची कामे पुढील ६ महिन्यात करून
वाहतुकीस खुली करण्यात यावी.

——-

राजमार्ग प्राधिकरण, पुणे मनपा, प्रादेशिक परिवहन विभाग

नवले पूलालगत अपघात मदत कक्षाची आवश्यक  मनुष्यबळ व यंत्रणेसह कार्यान्वित करावी.


 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0