Pune Wells and Borewells GIS Survey | शहरातील सर्व विहिरी आणि ५ हजार बोअरवेल चे केले जाणार GIS सर्वेक्षण | भूजल पातळी जाणून घेण्यास होणार मदत
| सुमारे ८४ लाख येणार खर्च
PMC Environment Department – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील प्राधान्याने सर्व विहरी व अंदाजे ५००० बोअरवेल चे GIS पद्धतीवर सर्वेक्षण केले जाणार आहे. यामुळे भूजल पातळी जाणून घेण्यास मदत होणार आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे या संस्थेकडून, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील अनुसूची ड मधील प्रकरण ५ कलम (२) (२) नुसार हे काम करून घेतले जाणार आहे. यात मोबाईल अॅप, वेबसाईट व म.न.पा. च्या सेवकांसाठी ट्रेनिंग देणे इ. कामे करून घेतली जातील. यासाठी ८३ लाख ७५ हजार इतका खर्च येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव महापालिका पर्यावरण विभागाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Standing Committee)
| वाढत्या नागरी वसाहतींमुळे शहराच्या मुलभूत सोयी सुविधांवर ताण
पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहराच्या चहुबाजूंनी होणारे शहरीकरण व वाढत्या नागरी वसाहतींमुळे शहराच्या मुलभूत सोयी सुविधांवर ताण निर्माण होत असून सुधारीत राहणीमान, विविध शैक्षणिक सुविधा, औद्यागिकरण, आय. टी. क्षेत्र अशा विविध घटकांमुळे शहराची वाढ होत आहे. पुणे शहराचा गेल्या दशकात झालेला कायापालट व भौगोलिक विस्तार यांमुळे पिण्याच्या पाण्याच्या गरजेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये ‘पाणीपुरवठा’ ही एक मुलभूत सुविधा आहे. पुणे म.न.पा. तर्फे वारजे, वडगाव, वाघोली, पर्वती, लष्कर व होळकर येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारून शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. पुणे शहराच्या उत्तर-पूर्व भागांत पाण्याची टंचाई जाणवत असल्याने भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. खडकवासला धरणातील पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया केल्यानंतर एकूण २० पंपिंग स्टेशन्स मार्फत बंदिस्त पाईपलाईनद्वारे शहरात विविध ठिकाणी पाणी पुरविण्यात येते. तसेच पुणे महानगरपालिकेने भविष्यातील सर्व इमारतींकरीता पर्यावरणपूरक बांधकाम करण्यावर भर दिला आहे. यामध्ये जलसंवर्धन व रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आले आहे.
| विहीर, बोअर वेल ची नेमकी संख्या पुणे महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही
पुणे शहरामध्ये एकूण ५१९ चौरस कि.मी. क्षेत्र हद्दीमध्ये किती विहीर / बोअर वेल आहे. याबाबत सर्वेक्षण झाले नसल्याने विहीर / बोअर वेल ची नेमकी संख्या पुणे महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही. पुणे शहरासाठी विहरींचे सर्वेक्षण करण्यास प्राधान्य असल्याने, सदर प्रस्तावित सर्वेक्षणाचे कामातून प्रथमतः सर्व विहिरीचे सर्वेक्षण करून त्यासोबत शहरातील विविध भागातील विहीरीसह अंदाजे ५००० बोअरवेल चे सर्वेक्षण केल्यास भूजलाची पातळी जाणून घेणेस मदत होणार आहे. भविष्यात सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आणखी तरतूद उपलब्ध करावी लागणार आहे. महापालिका आयुक्त यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे या संस्थेकडून, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील अनुसूची ड मधील प्रकरण ५ कलम (२) (२) नुसार प्राधान्याने सर्व विहीरी व अंदाजे ५००० बोअरवेल च्या GIS पद्धतीवर सर्वेक्षण करणे, त्यासाठी मोबाईल अॅप, वेबसाईट व म.न.पा. च्या सेवकांसाठी ट्रेनिंग देणे इ. कामे विहिरी करून घेणे या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. पुणे शहरातील सर्वसाधारण ५००० अथवा बोअरवेल यांचे सर्वेक्षण करणेसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे यांचे प्रस्तावानुसार ५०००(विहिरी/बोरवेल) * १६७५ (दर) = र.रु. ८३,७५,००० /- इतका खर्च होणार आहे.
| भूजल स्त्रोतांबद्दल जाणून घेणे गरजेचे
पुणे शहरात महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या पाण्या व्यतिरीक्त अनेक रहिवासी, व्यासायिक भागांची पाण्याची गरज भागविण्यासाठी विहिरी व बोअरवेलचा वापर केल्याने भूजलाचा उपसा केला जात आहे व पुणे शहरातील अनेक भागांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे भूजल (बोअरवेल, विहिरी) चा वापर
दिवसेंदिवस वाढत आहे. घरगुती, व्यवसायिक आणि संस्था क्षेत्रात भूजल वापर पुणे महापालिकेकडे शहरातील सर्व भूजल स्रोतांची अद्ययावत व एकत्रित माहिती उपलब्ध नाही. तसेच शहरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पाण्याचा शाश्वत वापर होण्याकरिता भूजल साठ्यांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी पुणे शहरातील भूजल स्त्रोतांबद्दल जाणून घेणे गरजेच आहे याकरिता पुणे महापालिकेसाठी भूजल स्त्रोतांची यादी (इन्व्हेंटरी) करणे आवश्यक आहे भविष्यातील पाणी व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करायचे असेल, तर सर्व भूजल स्त्रोतांची माहिती (inventory) असणे ही एक अत्यावश्यक बाब झाली आहे.
माहिती (Inventory) तयार केल्याने पुणे महानगरपालिकेला त्याचा उपयोग खालीलप्रमाणे होऊ शकतो.
या यादीतून कुठे बोअरवेल आहेत, किती भूजल वापरले जाते, कुठे जास्त पाण्याचा उपसा होतो हे स्पष्ट होईल या आधारावर भूजल वापरावर नियोजन व नियंत्रण आणणे करीता नवीन धोरण तयार करणे आणि पाणीवापर नियमन करणे शक्य होईल.
पाणीटंचाईच्या वेळी मदत (Water Security); उन्हाळ्यात किंवा दुष्काळाच्या वेळी या यादीतील कार्यरत विहिरी आणि बोअरवेल्सचा वापर करून पर्यायी पाणीपुरवठा करता येऊ शकतो, त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत निर्णय घेणे सोयीचे होईल.
जलस्तर व भूजल व्यवस्थापन (Aquifer Management): भूजल स्रोतांची माहिती मिळाल्यावर त्यावर आधारित भूगर्भातील पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता योजना तयार करणे शक्य होणार आहे. यामध्ये योग्य ठिकाणी जलभरण संरचना उभारणे, पाण्याचा वापर मर्यादित ठेवणे, आणि जमिनीत पाणी साठवण्याचे उपाय करणे या बाबी सुचविता येतील.
स्वस्त व सहज उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य वापर (Efficient Use of a Low-Cost Resource): भूजल हे नागरिकांसाठी सर्वात स्वस्त, सहज उपलब्ध आणि स्थानिक स्रोत आहे. जर भूजल योग्य प्रकारे वापरले गेले आणि त्याचे नियोजन केले तर भूपृष्ठभागावरील (surface water) पाण्यासाठी लागणाऱ्या योजना व पायाभूत सुविधा (जसे की जॅकवेल, जलवाहिन्या, पंपिग स्टेशन, पाण्याच्या टाक्या इ) यांवरील खर्च काही प्रमाणात कमी करता येईल. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक शाश्वतता टिकवणे शक्य होईल.
शहर विकासाशी संलग्र नियोजन (Urban Planning Integration): भूजल उपलब्धतेनुसार शहराचे नोनिंग, नवीन इमारतींसाठी परवानग्या, रस्ते व पाणीपुरवठा योजना तयार करणे शक्य होईल जिथे भूजल पलब्धता कमी आहे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे व पर्यायाने या ठिकाणी जलसंवर्धन व रेन बॉटर हार्वेस्टिंग वर भर देता येवू शकते,
निरीक्षण आणि जनजागृती (Monitoring and Public Awarerness): विहिरी आणि बोअरवेल्सची मित तपासणी करून जलस्तर आणि पाण्याची गुणवत्ता कशी बदलते हे समजू शकते. या बद्दलची माहिती रिकांनाही कळविल्यास त्यांच्यात पाणी जपण्याची जागृती निर्माण करता येईल.
२०२५-२६ च्या बजेट मध्ये भूजल संबंधी कामे करण्यासाठी RE26E120 पुणे शहरातील ‘भूजल’ अंतर्गत विविध कामे करणे एकूण तरतूद ९० लक्ष हे बजेट उपलब्ध करण्यात आले आहे. कोड साठी वित्तीय समितीची ९० लक्ष इतकी मान्यता प्राप्त झाली आहे.

COMMENTS