PMC Heritage Walk | १५ आणि १६ नोव्हेंबर ला पुणे महापालिकेकडून हेरीटेज वॉक चे आयोजन!

Homeadministrative

PMC Heritage Walk | १५ आणि १६ नोव्हेंबर ला पुणे महापालिकेकडून हेरीटेज वॉक चे आयोजन!

Ganesh Kumar Mule Nov 06, 2025 8:47 PM

Let’s Talk | संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ फलकाचे उद्घाटन
Pune News | रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून आंदोलन
Mohan Joshi | Telangana Election Results| तेलंगणातील काँग्रेसच्या विजयात पुण्याच्या मोहन जोशींचा मोठा वाटा

PMC Heritage Walk | १५ आणि १६ नोव्हेंबर ला पुणे महापालिकेकडून हेरीटेज वॉक चे आयोजन!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहराला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. शहराच्या या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची ओळख नागरिकांना होण्यासाठी पुणे मनपा तर्फे ऐतिहासिक स्थळभेट (हेरीटेज वॉक) चे आयोजन करण्यात आलेले आहे.  हेरीटेज वॉक १५ व १६ नोव्हेंबर  शनिवार व रविवार सकाळी ७ वाजता होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

यासाठी तिकीट दर पुढीलप्रमाणे आहेत.:

१) प्रौढांसाठीरु.३००

२) उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी . २००/

३) माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी रु.१००/-

४) परदेशी पर्यटकांना र.रु.५००/-

नागरिकांसाठी सविस्तर माहिती व बुकिंग https://heritagewalk.pmc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पुणे मनपाचे सल्लगार अजित वामन आपटे(९८२२३९९४६०) यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

या हेरीटेज वॉकमध्ये पुणे शहरातील शिवाजी पूल, घोरपडे घाट, शनिवार वाडा, कसबा गणपती मंदिर, लालमहाल, नानावाडा, भाऊ रंगारी निवासस्थान, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ गणपती मंदिर, भिडे वाडा, नगर वाचन मंदिर, बेलबाग मंदिर, महात्मा फुले मंडई, तुळशीबागवाले राम मंदिर, विश्रामबाग वाडा या वास्तूंविषयी माहिती देण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी पुणे शहराच्या जुन्या, ऐतिहासिक वास्तू व वैभवाची माहिती करून घ्यावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: