PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत दोन उपायुक्त आणि एक सहायक आयुक्त यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती

Homeadministrative

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत दोन उपायुक्त आणि एक सहायक आयुक्त यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती

Ganesh Kumar Mule Sep 15, 2025 10:56 PM

PMC Health Department | तर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केली जाणार कारवाई | आरोग्य प्रमुखांचा इशारा
Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण 
Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला मंडळांना ज्ञानेश्वरी, हस्तलिखित एकनाथी भागवत व रोप वाटप

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत दोन उपायुक्त आणि एक सहायक आयुक्त यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती

 

PMC Officers Deputation – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत दोन उपायुक्त आणि एक सहायक आयुक्त यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने नुकतेच याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

राज्य सरकारच्या वतीने मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोलापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या रवी पवार यांची पुणे महापालिकेत उपायुक्त या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. रवी पवार हे मुख्याधिकारी गट अ संवर्गातील आहेत. त्याचप्रमाणे फलटण नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करणारे निखिल मोरे यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी पदावर काम पाहणाऱ्या सोमनाथ आढाव यांची पुणे महापालिकेत सहायक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती २ वर्षासाठी अथवा पुणे महापालिकेतील अधिकारी पदोन्नती ने उपलब्ध होईपर्यंत असेल. शासनाचे अवर सचिव अ का लक्कस यांनी हे आदेश जारी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: