PMC Smart Collection Center | महापालिका आयुक्त यांच्याकडून फिडर पॉइंट ची पाहणी | फिडर पॉइंट चे स्मार्ट कलेक्शन पॉइंट मध्ये रुपांतर
PMC Feeder Point – (The Karbhari News Service) – “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे” या अभियान अंतर्गत पुणे शहरामधील कचऱ्याचे निवारण करण्याकरिता तसेच पुणे शहरातील कचरा समस्या सोडविण्याकरिता नवनवीन उपाययोजना राबविण्यात येत असून आज सकाळी ११:३० वाजता महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १७ मधील बुरुडी पूल येथील फिडर पॉइंट चे स्मार्ट कलेक्शन पॉइंट मध्ये रुपांतर होत असलेल्या ठिकाणी अचानक भेट देऊन सदर फिडर पॉइंटची पाहणी केली. याच बरोबर सदर भागात लोकसंख्या, व्यावसायिक भाग, रहीवाशी व आस्थापना यांचा जमा होणाऱ्या कचऱ्याचे दैनंदिन संकलन व वाहतूक इत्यादी बाबींचा आढावा घेतला. (PMC Solid Waste Management Department)
तसेच सदर परिसरातील नागरिक व व्यावसायिक वर्ग यांच्याशी संवाद साधत असताना परिसरातील नागरिकांनी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत आरोग्य / घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत घरोघरी रहिवाशी व आस्थापनाचा दैनंदिन कचरा संकलन, कचरा उठाव, परिसर स्वच्छता इत्यादी कामकाजावर परिसरातील नागरिक व व्यावसायिक वर्ग यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त करून मा. महापालिका आयुक्त यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन आभार व्यक्त केले. यावेळी मा. महापालिका आयुक्त यांनी सदर प्रभागातील कामकाज पाहून वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम यांचे कौतुक केले.

यावेळी महापालिका आयुक्त यांनी परिसरातील नागरिकांना आणि व्यापारी वर्ग यांना “आपला परिसर आपली जबाबदारी” म्हणून स्वच्छतेचे पालन करण्याकरिता प्रबोधन करण्यात आले असून परिसरातील नागरिक, व्यापारी वर्ग, समाजसेवक, मा. सभासद, मा. उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन कार्यालय, मुख्य आरोग्य निरीक्षक, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, ह्युमन मेट्रिक्सचे अधिकारी व समन्वयक, स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे समन्वयक व सभासद, यांच्या समवेत स्वच्छते विषयक शपथ विधी घेण्यात आली.
सदर ठिकाणी परिसरातील नागरिक, व्यापारी वर्ग, समाजसेवक, सभासद विशाल धनवडे, उप आयुक्त संदीप कदम, ( घनकचरा व्यवस्थापन विभाग ), मुख्य आरोग्य निरीक्षक इमामुद्दीन इनामदार, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय कडील महापालिका सहाय्यक आयुक्त किसन दगडखैर, उप प्रमुख आरोग्य निरीक्षक मुख्त्तार सैय्यद, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, कार्यकारी अभियंता प्रसाद जगताप, उप अभियंता कमलेश शेवते, ह्युमन मेट्रिक्स संस्थेचे अधिकारी मयंक दुबे, मनोज कुमार कौर, सुयेश माथुर, किरण तोतरे, प्रभारी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, मोहन चंदेले, आरोग्य निरीक्षक, चंद्रवदन गायकवाड, , नितीन साळुंके, निलेश चव्हाण, राजू बागुल, गोविंदा पाटोळे, श्री. प्रमोद गायकवाड, तौसीफ देशपांडे, शिवाजी गायकवाड मोकदम मनेष वर्देकर, सेवक, स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे समन्वयक व सभासद उपस्थित होते.

COMMENTS