PMC Chief Auditor | अखेर पुणे महापालिकेचा मिळाला पूर्ण वेळ मुख्य लेखापरीक्षक!

Homeadministrative

PMC Chief Auditor | अखेर पुणे महापालिकेचा मिळाला पूर्ण वेळ मुख्य लेखापरीक्षक!

Ganesh Kumar Mule Aug 30, 2025 9:12 AM

Pune News | Team CM च्या सदस्यांनी वाचवले सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे प्राण! 
Assistant Commissioner | PMC | सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | वर्ग 3 मधील कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक आयुक्त
Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला मंडळांना ज्ञानेश्वरी, हस्तलिखित एकनाथी भागवत व रोप वाटप

PMC Chief Auditor | अखेर पुणे महापालिकेचा मिळाला पूर्ण वेळ मुख्य लेखापरीक्षक!

| राज्य सरकार कडून प्रतिनियुक्ती वर नियुक्ती

 

PMC Chief Auditor – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेला अखेर पूर्ण वेळ लेखापरीक्षक मिळाला आहे. विठ्ठल शिवाजी चव्हाण यांची पुणे महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक पदी प्रतिनियुक्तीने (Deputation) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून या बाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा सह महापालिका आयुक्त अंबरीष गालिंदे (Ambrish Galinde PMC) हे सेवानिवृत्त झाले आहेत. हे पद रिक्त झाल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार हा पुणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (PMC Chief Finance Officer) जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe PMC) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान या पदासाठी पूर्ण वेळ अधिकारी कधी मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यानुसार सरकारने पूर्ण वेळ अधिकारी दिला आहे.

दरम्यान या आधी मुख्य लेखापरीक्षक हे पद महापालिका अधिकाऱ्या मधून पदोन्नती ने भरले जात होते. मात्र या पदाबाबत महापालिका अधिनियमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता महापालिका अधिनियम ४५ अ नुसार हे पद प्रतिनियुक्तीने भरले जाणार आहे. या अधिनियमानुसार राज्य सरकार वित्त व लेखा सेवेतील उप संचालकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल अशा योग्य अधिकाऱ्याची महापालिका मुख्य लेखापरिक्षक म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करेल. त्यानुसार आता या पदावर शासनाचा अधिकारी नेमण्यात आला आहे. महापालिका अधिकाऱ्यांना आता या पदावर काम करण्याची संधी मिळणार नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: