Kasba Peth Metro Station | कसबा मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्र 2 प्रवाशांसाठी सुरू
Pune Metro Station – (The Karbhari News Service) – पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील कसबा मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्र 2 आज 29 ऑगस्ट पासून कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने (MLA Hemant Rasane) यांच्या हस्ते प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले. (Pune Metro News)
गणेशोत्सवाच्या काळात हे प्रवेशद्वार सुरू झाल्यामुळे गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोय होणार आहे.
हे प्रवेशद्वार साततोटी पोलिस चौकीच्या जागेवर उभारण्यात आले आहे. प्रवेशद्वार क्र 2 हे मुख्य रस्त्यावर असून यामुळे कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, भाई आळी आणि भीम नगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना फायदा होणार आहे. या प्रवेशद्वारापासून महानगर पालिकेचे मुख्य रुग्णालयांपैकी एक असणारे कमला नेहरू रुग्णालय हे खूप जवळ आहे. या प्रवेशद्वारामुळे प्रवाश्यांना मुख्य रस्त्यापासून मेट्रो स्थानकात जाणे अतिशय सोपे होणार आहे.
याचबरोबर येरवडा मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्र 2 व प्रवेशद्वार क्र 3 येथील एस्किलेटर (सरकता जिना) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले आहेत.


COMMENTS