PMC Ward 1 – Kalas – Dhanori | प्रभाग क्रमांक १ – कळस – धानोरी | प्रभागाची व्याप्ती, लोकसंख्या असे सर्व काही जाणून घ्या
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता हरकती आणि सूचना घेतल्या जात आहेत. दरम्यान या प्रभाग रचनेवर विरोधक आक्षेप देखील घेत आहेत. आपण इथून पुढे प्रत्येक दिवशी एका प्रभागाची व्याप्ती जाणून घेणार आहेत. त्यानुसार आज आपण प्रभाग क्रमांक १ विषयी सर्व काही जाणून घेणार आहोत. (Pune Corporation Election 2025)
प्रभागाचे नाव – कळस – धानोरी
प्रभागाची लोकसंख्या – एकूण ९२६४४ – अ.जा. १८०१० – अ. ज. २२७४
निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती – धानोरी गावठाण, कळस गावठाण, गंगाकुंज सोसायटी, लक्ष्मी टाऊनशिप १, २ व ३. ब्रुकसाईड सोसायटी, विशाल परिसर आर. अँड डी.ई. कॉलनी, भिमनगर वसाहत. सिध्दार्थ नगर, मुंजाबा वस्ती, भैरवनगर, गोकुळ नगर, आनंद पार्क, चौधरी नगर, म्हस्के वस्ती, कळस गणेश नगर, ग्रेफ सेंटर, पोरवाल पार्क, कुतवळ कॉलनी, निंबाळकर नगर, साठे नगर, सिद्धेश्वर नगर कुमार समृद्धी ब्रम्हा स्काय सिटी, खेसे पार्क इ.
उत्तर: मुळा नदी मोजे कळस व मौजे बोपखेलची हद्दीस जेथे मिळते तेथून उत्तरेस मौजे कळस व मौजे बोपखेलच्या हद्दीने मौजे दिघीच्या हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस पुढे मौजे कळस व मौजे दिघीच्या हद्दीने पुणे-आळंदी रस्ता ओलांडून मौजे धानोरीच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस मौजे धानोरी व मौजे दीघी यांचे हद्दीने मौजे धानोरी, मौजे चन्होली, मौजे दिघी यांची हद्दीस मिळेपर्यंत. तेथून पुर्वेस मौजे धानोरी, मौजे चन्होली यांचे हद्दीने मौजे धानोरी व मौजे लोहगांव यांचे हद्दीवरील नाला ओलांडून व पुढे मौजे लोहगांव व मौजे वडगाव शिंदे यांचे हद्दीने वडगाव शिंदे गावाकडे. जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत.
पुर्वः मौजे लोहगांव व मौजे वडगाव शिंदे यांची हद्द वडगाव शिंदे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यास जेथे मिळते तेथून दक्षिण पश्चिमेस वडगाव शिंदे रस्त्याने छ. शिवाजी चौकात मोझेआळी वडगाव रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने संत तुकाराम मंदिराजवळ दक्षिण हद्दीस मिळेपर्यंत (लोहगाव मधील जुना वॉर्ड नं. २ ची दक्षिण हद्द) तेथून पश्चिमेस लोहगाव मधील जुना वॉर्ड नं. २ ची दक्षिण हद्दीने माथाडे वस्तीमधील श्रीराम लोटस सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने लोहगाव – वडगाव शिंदे रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस व पुढे विश्रांतवाडी लोहगाव रस्त्याने कलवड वस्तीमधील रस्त्यास मिळेपर्यंत.
दक्षिण: धानोरी लोहगाव रस्ता कलवड वस्ती मधील रस्त्यास जेथे मिळतो तेथून उत्तरेस कलवड वस्तीमधील रस्त्याने स्टार अपार्टमेंटच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने धानोरी – टिंगरेनगर मधील नाल्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पश्चिमेस सदर नाल्याने हवालदार मळ्यातील नंदन युफोरिया सोसायटी, सिद्धेश्वर नगर, कुमार समृध्दी सोसायटीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने एकता नगर जवळ सिद्धेश्वर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस व पुढे दक्षिणेस सिद्धेश्वर नगरच्या पूर्वेकडील रस्त्याने विश्रांतवाडी लोहगांव रस्त्यास मिळेपर्यंत, (मुकुंदराव आंबेडकर रस्त्यास) तेथून पश्चिमेस विश्रांतवाडी लोहगाव रस्त्याने मुकुंदराव आंबेडकर चौकात (विश्रांतवाडी चौकात) पुणे आळंदी रस्त्यास (संत ज्ञानेश्वर रस्त्यास ) मिळेपर्यंत.
पश्चिम – विश्रांतवाडी लोहगाव रस्ता मुकुंदराव आंबेडकर चौकात (विश्रांतवाडी चौकात) पुणे आळंदी रस्त्यास (संत ज्ञानेश्वर रस्त्यास) जेथे मिळतो तेथून उत्तरेस पुणे आळंदी रस्त्याने व पुढे मौजे कळस मधील छ. शिवाजी महाराज रस्त्याने कळस मधील प्रेमलोक प्लाझा सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर हद्दीने मधुबन सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने जाधव वस्तीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत. (सेंट चावरा केथेलिक चर्चच्या दक्षिणेकडील हद्द) तेथून पश्चिमेस सदर हद्दीने कळस स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत तेथून सदर रस्त्याने व पुढे कळस स्मशानभूमीच्या पश्चिमेकडील हद्दीने मुळा नदीस मिळेपर्यंत, तेथून उत्तर पश्चिमेस मुळा नदीने मौजे कळस व मौजे बोपखेलची हद्दीस मिळेपर्यंत.

COMMENTS