Plastic Ban in PMC Offices | प्लास्टिक फाईल्स, प्लास्टिक बॉटल्स, चहाच्या कागदी कपांचा वापर त्वरीत बंद करा | सर्व विभाग, क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ यांना महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे सक्त आदेश
Prithviraj B P IAS – (The Karbhari News Service) – कार्यालयामध्ये प्लास्टिक फाईल्स, प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक कप, प्लास्टिक लावलेले बुके इ. वस्तूंचा वापर करण्यात येऊ नये. तसेच चहासाठी वापरल्या जाणा-या कागदी कपांच्या आतील बाजूस प्लास्टिकचे आवरण असल्यामुळे चहाच्या कागदी कपांचा वापर त्वरीत बंद करण्यात यावा. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सर्व विभाग, क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ यांना दिले आहेत. (Pune Municipa Corporation – PMC)
महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे ( उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी व साठवणूक ) अधिसूचना, २०१८ नुसार प्लास्टिक वापर बंद करणेबाबत
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अधिसूचना नुसार अविघटनशील कचऱ्यामुळे एकूणच नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असल्याने “महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे ( उत्पादन, वापर विक्री, वाहतुक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना, २०१८ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच या अधिसूचनेमध्ये वेळोवेळी सुधारणा देखील करण्यात आलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने सर्व विभागांना कळविण्यात आले आहे कि, आपले कार्यालयामध्ये प्लास्टिक फाईल्स, प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक कप, प्लास्टिक लावलेले बुके इ. वस्तूंचा वापर करण्यात येऊ नये. तसेच चहाच्या कागदी कपांचा वापर त्वरीत बंद करण्यात यावा. या नियमांचे पालन करणेविषयी आपले विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करण्यात यावे. असे अतिरिक्त आयुक्त यांच्या स्वाक्षरीने घनकचरा विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS