PMC Municipal Secretary Department | कामाच्या सोयीसाठी विभिन्न विभागात गेलेले कर्मचारी पुन्हा नगरसचिव विभागात परत येणार
Pune PMC News – (The Karbhari News Service) – कोरोना कालावधी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने कामाच्या सोयीसाठी नगरसचिव विभागातील काही कर्मचारी विभिन्न विभागात वर्ग केले होते. मात्र आता नगरसचिव कार्यालयाकडील अपुरे मनुष्यबळ व त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करून अन्य खात्यामध्ये कामकाजासाठी वर्ग करण्यात आलेला सेवक वर्ग पुन्हा नगरसचिव कार्यालयास उपलब्ध करून मिळणेस नगरसचिव यांनी मागणी केली होती. त्यास अनुसरून या सेवकांना नगरसचिव विभागाकडे प्रत्यक्ष कामाकरिता नेमणूक करणेबाबत मान्यता देण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी हे आदेश जारी केले आहेत. (M J Pradip Chandren IAS)
हे आहेत कर्मचारी
वडके निलेश – समिती लेखनिक
ठाणगे उज्वला -समिती लेखनिक
बहिरट राजु -लिपिक टंकलेखक
कांबळे अशोक -लिपिक टंकलेखक
किशोर चव्हाण -शिपाई
ताडे नंदकुमार – शिपाई
निखिल बहिरट -शिपाई
धामुनसे प्रकाश – शिपाई
शेवकर सुनिल – शिपाई
बोल्लू तिरुपती -शिपाई
कुऱ्हाडे पुष्पा -शिपाई
यशोदा मोरे – बिगारी
वरील सेवकांस प्रत्यक्ष कामासाठी नगरसचिव विभागाकडे हजर होणेकरीता कार्यमुक्त करण्यात आलेआहे. यासाठी स्वतंत्र कार्यमुक्ती आदेशाची आवश्यकता नाही. तरी संबधित खातेप्रमुख/प्रशासन अधिकारी यांनी पुढील योग्यती तजवीज करावी. असे आदेशात अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी म्हटले आहे.

COMMENTS