PMC Solid Waste Management | १ जुलै पासून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील फुटपाथसह रस्त्यांची स्वच्छता | घनकचरा विभाग विविध विभागांना सहभागी करून घेणार 

Homeadministrative

PMC Solid Waste Management | १ जुलै पासून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील फुटपाथसह रस्त्यांची स्वच्छता | घनकचरा विभाग विविध विभागांना सहभागी करून घेणार 

Ganesh Kumar Mule Jun 28, 2025 2:38 PM

Pune Water cut on Thursday | पुणे शहरात काही भागात  गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
PMC Book of School Student Travel Scheme | पुणे महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थी प्रवास योजना उपक्रमाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन 
PMC Water Budget | महापालिकेकडून 20.90 टीएमसी पाणी देण्याची मागणी ; पण पाटबंधारेने मात्र फक्त 12.82 TMC पाणी कोटा केला मंजूर

PMC Solid Waste Management | १ जुलै पासून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील फुटपाथसह रस्त्यांची स्वच्छता | घनकचरा विभाग विविध विभागांना सहभागी करून घेणार

Sandip Kadam PMC – (The Karbhri News Service) – पुणे शहराच्या सर्वांगीण स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त यांचा स्वच्छ पुणे अभियान ही मोहीम राबविण्याचा मनोदय आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ जुलै पासून ४ जुलै २०२५ पर्यंत पहिला टप्पा अंतर्गत सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील फुटपाथसह रस्त्यांची स्वच्छता व त्या अनुषंगाने डीप क्लिन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्षेत्रिय कार्यालयाकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाबरोबरच अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, किटक प्रतिबंधक विभाग, उद्यान विभाग, ड्रेनेज विभाग, पाणीपुरवठा विभाग, पथ विभाग, विद्युत विभाग, शिक्षण विभाग, मोटार वाहन विभाग, बांधकाम व परवानगी विभाग अशा सर्व विभागांना देखील सहभागी करून घेतले जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.  (Pune Municipal corporation – PMC)

क्षेत्रिय कार्यालये – प्रभागातील झोपडपट्टी भाग व त्यालगतचे मुख्य रस्ते याठिकाणी झाडणकाम करणे, डिव्हायडरचे कडेला साचलेली माती उचलणे, भित्तीपत्रके काढणे, डिव्हायडर व फुटपाथ स्वच्छ करणे, वाढलेले गवत काढणे, अस्ताव्यस्त स्थितीतील बॅनर्स काढणे, फ्लायओव्हर खालील जागेची स्वच्छता, फेरीवाल्यांचे / दुकानांचे कच-यासंबंधीत नियोजन करणे, कच-याचे ढीग स्वच्छ करणे, ड्रेनेज साफसफाई करणे, इत्यादी कामे क्षेत्रिय कार्यालयाकडील आरोग्य कोठीवरील सफाई सेवकांकडून करून घ्यावयाची आहेत. ज्या क्षेत्रिय कार्यालयांकडे नदी किनारे किंवा इतर पाण्याची ठिकाणे आहेत, त्याठीकाणी देखील वरीलप्रमाणे सर्व स्वच्छता विषयक कामकाज करावयाचे आहे. या स्वच्छता अभियानामध्ये विविध सामाजिक संस्था खाजगी संस्था व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रतिनिधींना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात यावे. या स्वच्छता मोहिमे दरम्यान निर्माण होणारा वर्गीकृत कचरा नजीकच्या प्रक्रिया प्रकल्पावर किंवा कचरा हस्तांतरण केंद्रावर जमा करण्यात यावा.

 

२. अतिक्रमण विभाग – रत्यावर बंद पडलेल्या दुचाकी, चारचाकी सायकल्स, हातगाड्या उचलून घ्यावयाच्या आहेत. अतिक्रमण झालेले रस्ते, फुटपाथ व जागा मोकळ्या करून घेण्यात याव्या.

3. आकाशचिन्ह व परवाना विभाग – अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स, भित्तीपत्रके काढून घ्यावयाचे आहेत.

४. कीटक प्रतिबंधक विभाग  – डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे व फवारणी करणे.

५.उद्यान विभाग –  रस्ते, बस स्टॉप किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी वाढलेली झाडे कापून कापलेले कटिंग उचलून न्यावयाचे आहे. डिव्हायडरमधील झाडांचे ट्रिमिंग करणे व तात्काळ उचलून घेणे, सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या अनावश्यक व धोकादायक असलेल्या फांद्या काढणे इ. कामकाज करावयाचे आहे. व अनावश्यक असलेले ट्री-गार्ड काढून घेण्यात यावे

६. पाणीपुरवठा विभाग – प्रभागातील सर्व सार्वजनिक वस्ती पातळीवरील शौचालयांच्या ठिकाणी पाणीपुरवठा आहे का याची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावयाची आहे. तसेच पाणी लिकेज असणा-या ठिकाणी दुरुस्ती करून घ्यावयाची आहे.

७. पथ विभाग – रात्यावरील खड्डे बुजविणे, राडारोडा उचलणे, अस्ताव्यस्त असलेले डीव्हाडर ब्लॉक्स, कर्बस्टोन सुस्थितीत ठेवणे, झेब्रा क्रॉसिंग पावसाळयानंतर पेंटिंग करणे आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करणे इत्यादी कामे करावयाची आहेत.

८. ड्रेनेज विभाग – चेंबर्सची झाकणे, तुटलेले पाईप्स निष्कशित करणे, ड्रेनेज चेंबर्स दुरुस्ती, ड्रेनेज साफसफाई करणे, इत्यादी कामे करावयाची आहेत. नदीच्या ज्या ठिकाणी नाल्यांचे पाणी सोडले जातात त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसून घेण्यात  याव्यात.

९. विद्युत विभाग – रस्त्यावर लोंबकाळणा-या वायर काढणे, अनावश्यक असणारे विद्युत पोल काढणे, विद्युत बॉक्सच्या ठिकाणी असणारा राडारोडा उचलून अशा ठिकाणी सुशोभिकरण करावयाचे आहे. ओपन डी. पी. बंदिस्त करून घेण्यात यावेत. तसेच डी. पी. ला काला / लाल रंगकाम करण्यात यावे.

१०. शिक्षण विभाग – क्षेत्रिय कार्यालयांतर्गत होणा-या या डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये मनपाचे व खाजगी महाविद्यालयाचे शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवून त्यांनी आपापल्या शाळेचा परिसर स्वच्छ करावयाचा आहे.

११. मोटार वाहन विभाग – या सर्व मोहिमेसाठी क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आवश्यक गाड्या, कचरा उचलण्यासाठी गाड्या व आवश्यकतेनुसार इतर वाहने मोटार वाहन विभागामार्फत पुरविण्यात यावीत.

१२. घनकचरा व्यवस्थापन – या सर्व कामकाजासाठी क्षेत्रिय कार्यालय स्तरावर गार्डन वेस्ट व C & D वेस्ट उचलण्याकरीता आवश्यक वाहने पुरविण्यात यावीत. तसेच संबंधीत उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी देखील या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे.

१३. बांधकाम परवानगी विभाग – संबंधीत उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी कारवाईचे | वेळी उपस्थित राहून ज्यांना नोटीसा दिलेल्या आहेत अशा | ठिकाणी फ्रंट मार्जिनच्या व पार्किंग मोकळे करण्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात यावी.

१४. क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील CT/PT स्वच्छता – परिमंडळ स्तरावरील ठेकेदारामार्फत या मोहिमेदरम्यान जेटिंग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालये, वस्ती पातळीवरील शौचालये व युरीनल्सची साफसफाई करण्यात यावी.

१५. मोहिमेचे नियोजन – परिमंडळ स्तरावरील ठेकेदारामार्फत या मोहिमेदरम्यान जेटिंग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालये, वस्ती पातळीवरील शौचालये व युरीनल्सची साफसफाई करण्यात यावी. या सूक्ष्म / खोलवर स्वच्छता मोहीमेसाठी संबंधीत परिमंडळ कार्यालयाचे उपायुक्त हे प्रमुख राहतील. सर्व परिमंडळ कार्यालयाकडील उपायुक्त यांनी वरील नमूद सर्व विभागांशी समन्वय साधून या डीप क्लिनिंग ड्राईव्हच्या अनुषंगाने क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून द्यावयाची आहे.

१६. नोडल ऑफिसर नियुक्ती –  वरीलप्रमाणे नमूद सर्व विभागांनी या डीप क्लिनिंग ड्राईव्हचे संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी करणेकरीता आपले विभागामार्फत एक नोडल ऑफिसर नियुक्त करावयाचा आहे. नोडल ऑफिसर्समार्फत ड्राईव्ह घेतलेल्या परिसरातील before व after चे फोटो काढून संकलित करून एकत्रित अहवाल सादर करावा.

१७. सर्व खातेप्रमुख व उपायुक्त – सर्व खातेप्रमुख व उपायुक्त यांनी नियुक्त करून दिलेल्या भागातील डीप क्लिन ड्राईव्हमध्ये सहभागी होऊन आपल्या भागातील ड्राईव्ह पार पाडण्याच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करावयाचे आहे.

१८. माहिती व जनसंपर्क अधिकारी – सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत होणा-या डीप क्लिन ड्राईव्हचा प्रचार व प्रसार करण्यात यावा.

या डीप क्लिन ड्राईव्हसाठी संबंधीत परिमंडळ कार्यालयाकडील उपायुक्त हे नोडल ऑफिसर म्हणून कामकाज पाहतील व आपले कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत डीप क्लिन ड्राईव्ह पार पाडण्याच्या अनुषंगाने आवश्यक वाहने, साहित्य व इतर विभागांचे सहकार्य याबाबत सर्व संबंधीत विभागांशी समन्वय साधून क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देतील. सर्व संबंधीत महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणी व्यक्तिश: उपस्थित रहावयाचे आहे. तसेच क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व विभागाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना देखील प्रत्यक्ष मोहिमेच्या वेळी उपस्थित राहणेविषयी अवगत करावे.
या deep cleaning drive चा अहवाल swmndata@punecorporation.org या संकेतस्थळावर, संबंधीत परिमंडळ कार्यालयाकडील उपायुक्त यांचेमार्फत सादर करावा. तदनंतर उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी सर्व माहिती एकत्रित करून आमचेमार्फत  महापालिका आयुक्त यांना सादर करावयाची आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: