Pune PMC News | शीतल वाकडे यांच्या नियुक्तीला पुणे महापालिकेत विरोध | महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना 

Homeadministrative

Pune PMC News | शीतल वाकडे यांच्या नियुक्तीला पुणे महापालिकेत विरोध | महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना 

Ganesh Kumar Mule May 31, 2025 1:28 PM

Pune Property Tax | सर्वांना समान न्याय मिळेल अशी कर रचना करणार | नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
Kranti Din | क्रांति दिवस उत्साहात संपन्न | महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचा उपक्रम 
Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी 

Pune PMC News | शीतल वाकडे यांच्या नियुक्तीला पुणे महापालिकेत विरोध | महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना

 

Pune Municipal Corporation  – (The Karbhari News Service) –  राज्य शासनाने शितल वाकडे (Sheetal Wakade) यांची पुणे महानगरपालिकेत (PMC Pune) प्रशासन अधिकारी या पदावर पदस्थापना  केली आहे.  या बदलीला पी एम सी एम्प्लॉईज युनियन (PMC Employees Union) या संघटनेने तीव्र विरोध केला आहे. वाकडे या पिंपरी महापालिकेत (PCMC) प्रशासन अधिकारी म्हणून का पाहत होत्या. शासनाने त्यांची बदली पुणे महापालिकेत केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

संघटनेने म्हटले आहे कि, प्रशासन अधिकारी या जागेवर पुणे महानगरपालिकेतील पदोन्नतीने 75 टक्के व 25% सरळसेवेने पद भरण्याची तरतूद असताना शासनाने प्रतिनियुक्तीने प्रशासन अधिकारी यांची बदली पुणे महानगरपालिकेत केले आहे. त्यामुळे सेवकांमध्ये प्रचंड नाराजी झाली असून त्यांनी या पदस्थापनेला विरोध दर्शवलेला आहे.  प्रशासन अधिकारी यांना कामावर रुजू करून घेण्यात येऊ नये. असे संघटनेने प्रशासनाला पत्राने कळवले आहे. जर विरोध डावलून प्रशासनाने रुजु करून घेतल्यास संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

संघटनेने पुढे म्हटले आहे कि, प्रशासन अधिकारी व उपअधीक्षक २५ टक्के असलेल्या सरळ सेवेच्या सर्व जागा रद्द करून 100% पदोन्नतीने भरण्यात याव्यात तसा राज्यशासनाकाडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा, राज्य शासनाची मान्यता येईपर्यंत सर्व जागांवरती मनपातील सेवकांना तदर्थ पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

——-

पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ हा  २६ ऑगस्ट २०१४ रोजी मान्य झाला असून प्रशासन अधिकारी व उप अधिक्षक नामनिर्देशन-२५% यासाठी असलेली पदे गेल्या १० वर्षापासून अद्याप भरलेली नाहीत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील विविध खात्यामध्ये प्रशासकीय कामकाज करताना अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासन अधिकारी 17 व उप अधिक्षक 54 पदांच्या नामनिर्देशन-२५% साठी असलेल्या रिक्त जागा प्रशासकीय कामकाजात गतिमानता येण्यासाठी एकवेळची बाब म्हणून तदर्थ पदोन्नतीने भरल्या जाव्यात असे आमचे मत आहे. यामुळे विविध खात्यामध्ये अधिकारी उपलब्ध होऊन कामकाज गतिमान होऊन नागरिकांना सेवा सुलभ रीतीने देणे शक्य होईल तसेच कनिष्ठ संवर्गामधून सेवकांना तदर्थ पदोन्नती मिळून वरिष्ठ पदाचे काम करण्यास मिळाल्याने कर्मचाऱ्यांना अनुभव प्राप्त होईल.

बजरंग पोखरकर – अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन पुणे महानगरपालिका