Plastic Free Society | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर वेंडिंग मशीनमधून फक्त १० रुपयांत पर्यावरणपूरक कापडी पिशवी  | पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचे उद्घाटन

HomeBreaking News

Plastic Free Society | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर वेंडिंग मशीनमधून फक्त १० रुपयांत पर्यावरणपूरक कापडी पिशवी | पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचे उद्घाटन

Ganesh Kumar Mule May 30, 2025 7:32 PM

Viksit Bharat Sankap Yatra | विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून महानगरपालिकेद्वारे विविध योजनांचा लाभ
PM Modi Pune Visit | आगामी काळात भव्य जाहीर सभा त्याच ठिकाणी | शहर भाजप कडून उद्घाटन सोहळ्या विषयी स्पष्टीकरण 
Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी! | 20 लोकांची निवडणूक लढवण्याची इच्छा

Plastic Free Society | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर वेंडिंग मशीनमधून फक्त १० रुपयांत पर्यावरणपूरक कापडी पिशवी

| पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचे उद्घाटन

 

Pankaja Munde – (The Karbhari News Service) – केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त पुढाकारातून एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्याची मोहिम देशभर राबवली जात आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसविण्यात आले. याचे उद्घाटन राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. (Pune News)

या प्रसंगी राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ, आमदार हेमंत रासने यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त हाती घेतलेल्या एकल प्लास्टिक बंदीच्या मोहिमेचा भाग आहे. देशभर प्लास्टिकमुक्त समाजनिर्मितीसाठी विविध उपाययोजना आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत.

या कार्यक्रमात बोलताना मा. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये प्लास्टिकमुक्त पर्यायांबाबत जागृती निर्माण करणे. मंदिर परिसरात उपलब्ध करण्यात आलेल्या वेंडिंग मशीनमधून फक्त १० रुपयांत पर्यावरणपूरक कापडी पिशवी सहज मिळू शकते. धार्मिक स्थळांवर प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याऐवजी अशा पर्यायांचा स्वीकार केल्यास पर्यावरण रक्षणास मोठा हातभार लागू शकतो. आम्ही दगडूशेठ ट्रस्टला या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली होती आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”

यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले,“पुण्याचं दगडूशेठ गणपती हे केवळ श्रद्धेचं नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचं प्रतीक आहे. पर्यावरण रक्षणासाठी मंदिर परिसरातून सुरू झालेला हा उपक्रम संपूर्ण पुणेकरांसाठी प्रेरणादायी आहे. कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे आणि अशा उपक्रमांना सर्वांचा सक्रिय पाठिंबा असला पाहिजे.या उपक्रमाच्या माध्यमातून धार्मिक स्थळांवरून सुरू झालेली पर्यावरणपूरक चळवळ ही संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.”

या कार्यक्रमाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनील रासने, कोषाध्यक्ष श्री. महेश सूर्यवंशी, तसेच ट्रस्टचे इतर पदाधिकारी, कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: