PMC Medical College | पुणे महापालिकेचे मेडिकल कॉलेज अडचणीत! | १ कोटी रुपयाच्या दंडाची नोटीस? 

Homeadministrative

PMC Medical College | पुणे महापालिकेचे मेडिकल कॉलेज अडचणीत! | १ कोटी रुपयाच्या दंडाची नोटीस? 

Ganesh Kumar Mule May 20, 2025 8:40 PM

Buddha Purnima | शिक्षण आणि नैतिकतेचा वापर समाजासाठी हवा : कुलसचिव डॉ. विजय खरे | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
BARTI Pune Fellowship फेलोशिप बाबत बार्टीचा सकारात्मक प्रतिसाद ; पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित
Buddha Vihara in Vishrantwadi | विश्रांतवाडीतील बुद्धविहाराला मिळणार हक्‍काची जागा |दोन गुंठे जागा ताब्यात घेण्याच्या कार्यवाहीला महापालिका आयुक्‍तांची मान्यता

PMC Medical College | पुणे महापालिकेचे मेडिकल कॉलेज अडचणीत | १ कोटी रुपयाच्या दंडाची नोटीस

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय चांगलेच अडचणीत आले आहे. गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारच्या (NMC) यांनी पुणे महानगरपालिकेला एक करोड रुपयाचा दंड का लावू नये अशी विचारणा केली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाला पूर्ण मान्यता देण्याकरिता नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्ट कडून मान्यता मिळविण्याचे प्रयत्न प्रामाणिक होताना दिसत नाही. असा आरोप माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी केला आहे. (PMC Health Department)

याबाबत डॉ धेंडे यांनीं महापालिका आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार  गेल्या दोन वर्षापासून पुणे महानगरपालिके मधील अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात केंद्र सरकार व राज्य सरकार वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याकडील केलेल्या पत्रव्यवरानुसार या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे. तसेच पुणेकरांना आरोग्य सुविधा अद्यावत मिळाव्यात याकरिता आत्तापर्यंत तीन पत्र व्यवहार आयुक्त यांच्याकडे केलेले आहेत. गेल्या वर्षी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी  यांनी याबाबत सखोल बैठक घेऊन या विषयावरती अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे वचन दिले. परंतु गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारच्या (NMC) यांनी पुणे महानगरपालिकेला एक करोड रुपयाचा दंड का लावू नये अशी विचारणा केली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाला पूर्ण मान्यता देण्याकरिता नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्ट कडून मान्यता मिळविण्याचे प्रयत्न प्रामाणिक होताना दिसत नाही. असे धेंडे यांनी म्हटले आहे.

धेंडे यांनी पुढे म्हटले आहे कि, राज्य शासनाने आदेश देऊन ही महानगरपालिका आस्थापना विभाग आकृतीबंध याला मान्यता देत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. आयुक्तांनी   यामध्ये तात्काळ लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा. अन्यथा महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपये हे वाया जातील. पुणेकरांना त्यांच्या हक्काचे व आरोग्याचे उपचार मिळण्यापासून ते वंचित राहतील तसेच हजारो विद्यार्थी जे वैद्यकीय शिक्षण इथे घेत आहे त्यांचे भविष्य देखील अंधारमय होईल. या पत्राचा आपण गांभीर्याने विचार कराल ही अपेक्षा अन्यथा विद्यार्थी व पुणेकरांसमवेत आंदोलन करावे लागेल. असा इशारा देखील डॉ धेंडे यांनी महापालिका आयुक्त यांना दिला आहे.