Pune Water Supply | अनधिकृत नळजोड व पाण्याचा गैरवापर करणाऱ्यावर पाणीपुरवठा विभाग मार्फत कारवाई!

Homeadministrative

Pune Water Supply | अनधिकृत नळजोड व पाण्याचा गैरवापर करणाऱ्यावर पाणीपुरवठा विभाग मार्फत कारवाई!

Ganesh Kumar Mule May 06, 2025 9:26 PM

PMC Employees Gratuity | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवली! 
RPI – BJP Yuti Pune | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) च्या वाट्याला ९ जागा!
Pune CP Amitesh Kumar | गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Water Supply | अनधिकृत नळजोड व पाण्याचा गैरवापर करणाऱ्यावर पाणीपुरवठा विभाग मार्फत कारवाई!

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – अनधिकृत नळजोड व पाण्याचा गैरवापर करणाऱ्यावर पाणीपुरवठा विभाग मार्फत कारवाई करण्यात आली. पाणी बचत आणि नागरिकांवर वचक बसावा या हेतूने ही कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune PMC News)

बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग मार्फत विमाननगर परिसरातील अनाधिकृत नळजोड व विद्युतपंप यावर  १७/०४/२०२५ व दिनांक २५/०४/२०२५ रोजी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विमाननगर येथील कैलास सुपर मार्केट आणि एस.आर.ए.योजना येथील एकूण पाच नळावरील विद्युत पंप काढण्यात आले व रेस्टॉरंट /कॅफे येथील दोन नळजोडावरील विद्युत पंप वर कारवाई करून जप्त करण्यात आले आहे. तसेच सोमनाथनगर येथील सुप्रभात सोसायटी लेन क्र २ येथील ३/४ इंच व्यासाचे दोन अनधिकृत नळजोड बंद करण्यात आले आहे. या पुढेही अनधिकृत नळजोड व विद्युत पंपावर कारवाई करण्यात येणार असल्याचे कनिष्ठ अभियंता, बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग यांनी कळविले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: