PMC Labor Welfare Department | महानगरपालिका सांस्कृतिक कलामंच तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Homeadministrative

PMC Labor Welfare Department | महानगरपालिका सांस्कृतिक कलामंच तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन 

Ganesh Kumar Mule May 02, 2025 8:45 PM

PMC Pune | Health camp | पुणे महापालिकेच्या कॅन्सर तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद 
Pune Municipal Corporation Budget | 25 फेब्रुवारी पर्यंत कामे पूर्ण करा | तरतूद लॅप्स झाल्यास खात्याची जबाबदारी!
Pune News | पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

PMC Labor Welfare Department | महानगरपालिका सांस्कृतिक कलामंच तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंच तर्फे बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन, मराठी नाटक व मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर केला. (Pune Municipal Corporation – PMC)

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन कामगार कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले. सहभागी १०० अधिकारी/ कर्मचारी यांनी सुंदर कलाकृतींचे सादरीकरण केले. सर्व कलाकारांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचा लाभ अनेक कामगारांनी घेतला आणि महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन नितीन केंजळे मुख्य कामगार अधिकारी तथा अध्यक्ष सांस्कृतिक कला मंच व त्यांचे सर्व सहकारी यांचे मार्फत करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये नितीन केंजळे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी  राजेश कामठे, मुख्य व्यवस्थापक, सांस्कृतिक केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.