MLA Siddharth Shirole | हॉस्पिटल्स चालविण्याबाबत महापालिकेने धोरण ठरवावे | विशेष वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत |आमदार सिद्धार्थ शिरोळे

Homeadministrative

MLA Siddharth Shirole | हॉस्पिटल्स चालविण्याबाबत महापालिकेने धोरण ठरवावे | विशेष वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत |आमदार सिद्धार्थ शिरोळे

Ganesh Kumar Mule Apr 23, 2025 6:14 PM

MLA Siddharth Shirole | जीबीएस रुग्णांसाठी अनुदानात वाढ मिळावी | आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मागणीवर आरोग्य मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Ramdas Athwale | महाविकास आघाडीला तख्त मिळू देणार नाही – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
Rajnath Sing in Pune | काँग्रेस ज्याच्या गळयात पडते त्याचे बुडणे निश्चित; केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची टीका

MLA Siddharth Shirole | हॉस्पिटल्स चालविण्याबाबत महापालिकेने धोरण ठरवावे | विशेष वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत |आमदार सिद्धार्थ शिरोळे

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – महापालिकेची हॉस्पिटल्स सुसज्ज यंत्रणेनिशी सुरळित चालविली जावीत, यासाठी निश्चित धोरण ठरविले जावे, हॉस्पिटल्समध्ये वैद्यकीय तज्ज्ञ (स्पेशल डॉक्टर्स) नेमले जावेत, अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. (Pune News)

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख नीना बोराडे आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली आणि छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने चर्चा केली.

या बैठकीत होमी भाभा हॉस्पिटल, बोपोडीतील संजय गांधी हॉस्पिटल, खेडेकर हॉस्पिटल, शेवाळे हॉस्पिटल आणि दळवी हॉस्पिटल येथील सुधारणांसंदर्भात चर्चा झाली. होमी भाभा हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे काम येत्या जुलै महिन्यापर्यंत पूर्ण झाले असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आमदार शिरोळे यांना दिली.

महापालिकेच्या संजय गांधी हॉस्पिटल मधील मॅटर्निटी वॉर्ड लवकर सुरू व्हावा, अशी आग्रही मागणी आ.शिरोळे यांनी केली. तसेच दळवी हॉस्पिटल मधील अडचणी सोडवून तेथील मॅटर्निटी वॉर्डही सुरळीत चालावा याबाबतही चर्चा करण्यात आली. या खेरीज खेडेकर हॉस्पिटल आणि शेवाळे हॉस्पिटल येथील अडचणी सोडविण्यासाठी चर्चा करून त्यावरच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

आरोग्य प्रमुख तसेच आरोग्य अधिकारी डॉ .नीना बोरुडे, डॉ.कल्पना बळीवंत, डॉ. संजीव वावरे, डॉ कोलते , हे अधिकारी उपस्थित होते.तसेच दत्ता खाडे, शैलेश बडदे, सुनील पांडे,सचिन वाडेकर, सुनीता वाडेकर, आनंद छाजेड, वसंत जुनवणे, प्रकाश सोळंकी, अपर्णा कुऱ्हाडे, सुजित गोठेकर, बंडू ढोरे, सुप्रीम चोंधे, रविराज यादव, बिरू खोमणे, अनिल भिसे, नीलिमा खाडे, सूरज शिंदे, हे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.