PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केले सर्क्युलर!

Homeadministrative

PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केले सर्क्युलर!

Ganesh Kumar Mule Apr 23, 2025 1:05 PM

PMC : 7th pay commission : वेतन लवकर करण्यासाठी प्रशासनाची लगबग  : बिल लेखनिकांना शनिवार, रविवारी काम करण्याचे आदेश 
Pune Municipal Corporation | सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात नोंदीच केल्या नाहीत
7th Pay Commission: Central employees will get good news on the evening of 28 March, new update will come regarding DA Hike

PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केले सर्क्युलर!

 

PMC Employees DA Hike – (The Karbhari News Service) – केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) २ टक्के वाढ मंजूर केली आहे. जानेवारी २०२५ पासून कर्मचाऱ्यांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याच धर्तीवर पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत कर्मचाऱ्यांना देखील (PMC Employees and Officers) सुधारित दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यात एकूण ३ महिन्यांचा म्हणजे जानेवारी ते मार्च चा फरक एप्रिल पेड इन मे २०२५ च्या वेतनात दिला जाणार आहे. तर सेवानिवृत्त सेवकांना ४ महिन्याचा फरक मे पेड इन जून च्या वेतनातून दिला जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी जारी केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्याबाबत पुणे मनपा व कामगार संघटना यांचेमध्ये करार झालेला असून केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्याचे धोरण व प्रचलित कार्यपध्दती आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचारी यांना महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करून जानेवारी पासून ५३ टक्के वरून ५५ टक्के दराने करण्यात आला आहे.

याबाबत जारी केलेल्या परिपत्रकानुसार महापालिका कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२५ पासून ५५% महागाई भत्ता दिला जाणार आहे. यात एकूण ३ महिन्यांचा फरक एप्रिल पेड इन मे च्या वेतनात दिला जाणार आहे. तसेच सेवानिवृत्त सेवकांना देखील ५५% महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. सेवानिवृत्त सेवकांना जानेवारी ते एप्रिल अशा ४ महिन्याचा फरक मे पेड इन जून च्या वेतनात अदा केला जाणार आहे. यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आदेशात पुढे म्हटले आहे कि, एप्रिल पेड इन मे २०२५ च्या पगार बिला मधून फरका सह रक्कम अदा करताना 24 महागाई भत्ता या अंदाजपत्रकीय तरतुदींवर खर्च टाकण्यात यावा. दरमहाच्या महागाई भत्त्याचा खर्च खात्याच्या वेतन विषयक तरतुदी मधून करण्यात यावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: