Pune Municipal Corporation Bharti 2025 | पुणे महापालिकेत लवकरच सरळसेवा भरती!

Homeadministrative

Pune Municipal Corporation Bharti 2025 | पुणे महापालिकेत लवकरच सरळसेवा भरती!

Ganesh Kumar Mule Mar 31, 2025 10:29 AM

Pune PMC JE Recruitment | राज्य सरकारच्या मार्गदर्शना अभावी दिड वर्षापासून थांबलीय कनिष्ठ अभियंता सरळसेवा भरती प्रक्रिया! | अर्ज केलेल्या २७८७९ उमेदवारांचे काय होणार?
PMC Employees Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची पदोन्नती प्रक्रिया नव्याने राबवण्याची मागणी
PMC RTI Nodal Officer | सामान्य प्रशासन विभागाला नकोय माहिती अधिकाराचे काम!

Pune Municipal Corporation Bharti 2025 | पुणे महापालिकेत लवकरच सरळसेवा भरती!

| महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू

 

PMC Pune Bharti 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरलिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-४ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेसाठी (Pune Municipal Corporation Bharti 2025) महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेत काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. (Pune PMC News)

समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग १ ते वर्ग – ४ मधील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. रिक्त पदे भरण्यासाठी महापालिका आयुक्त यांची देखील मान्यता प्राप्त झाली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला जानेवारी महिन्यात मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-४ या पदाची पदे भरणेबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आलेली असूनपदे सरळसेवेने भरणेकरिता पदांचा प्राधान्यक्रम निश्चित करणेसाठी  महापालिका आयुक्त यांनी  अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे अध्याक्षतेखाली CAFO, संबंधित खातेप्रमुख व उप आयुक्त, सामान्य प्रशासन (सचिव) अशी समिती स्थापन केली आहे.

त्यानुषंगाने अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी ०२ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता समितीची  बैठक आयोजित केली आहे. या समिती मध्ये सगळे खातेप्रमुख हे सदस्य आहेत.  त्यानुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व खाते प्रमुखांना दिले आहेत.