Vishwa Marathi Sammelan 2025 | विश्व मराठी संमेलनाची उद्या सांगता होणार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती!

HomeBooks

Vishwa Marathi Sammelan 2025 | विश्व मराठी संमेलनाची उद्या सांगता होणार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती!

Ganesh Kumar Mule Feb 01, 2025 9:34 PM

Navale Bridge | Supriya Sule | नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा | खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
New Financial Year | नवीन आर्थिक वर्षात आपले स्वागत आहे! |  तयार व्हा | आजपासून हे नियम बदलले आहेत
Pune PMC News | पालखी मार्गावरील  उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे  आदेश

Vishwa Marathi Sammelan 2025 | विश्व मराठी संमेलनाची उद्या सांगता होणार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती!

 

Raj Thackeray – (The Karbhari News Service) – फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Fergussion college Pune) मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची (3rd Vishwa Marathi Sammelan 2025)  सांगता रविवारी २ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने मराठी भाषिकांना राज ठाकरे यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. या समारंभाला अभिनेते रितेश देशमुख, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचीही उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती विश्व मराठी संमेलनाच्या नियोजन समितीच्या सदस्यांनी दिली आहे. (Pune News)

विश्व मराठी संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, विविध विषयांवरील सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रम रंगत आहेत. शनिवारी विश्व मराठी संमेलनात प्रशासकीय अधिकारी, रीलस्टार्स, लेखक, आयटीतज्ज्ञ यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनालाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. साधारण १०० दालनांमधील विविध प्रकारची पुस्तके घेण्यासाठी पुणेकरांनी शनिवारी दिवसभर गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात आयोजित केलेल्या बालसाहित्याच्या आविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

विश्व मराठी संमेलनाच्या शेवटच्या दिवशीही भरपूर साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
विश्व मराठी संमेलनाची आज रविवारी २ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता सांगता होणार आहे. यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला मा. राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सांगता समारंभात रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहतील, असे नियोजन समितीच्या सदस्यांनी सांगितले.