Pune Politics | शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच! | उद्धव सेने कडून भाजपात आलेल्या ५ माजी नगरसेवकांनी केले स्पष्ट | शिवसेना उद्या देणार उत्तर 

HomeBreaking News

Pune Politics | शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच! | उद्धव सेने कडून भाजपात आलेल्या ५ माजी नगरसेवकांनी केले स्पष्ट | शिवसेना उद्या देणार उत्तर 

Ganesh Kumar Mule Jan 09, 2025 10:14 PM

Shivsena Pune | पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट.!!
Vishwa Marathi Sammelan 2025 | मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठीजनांच्या प्रचंड उत्साहात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन
Shivsena | Kothrud | एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन 

Pune Politics | शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच! | उद्धवसेने कडून भाजपात आलेल्या ५ माजी नगरसेवकांनी केले स्पष्ट | शिवसेना उद्या देणार उत्तर

 

Pune News – (The Karbhari News Service) – नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या उद्धवसेनेच्या ५ माजी नगरसेवकांनी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा व्यक्ती केंद्रित असल्याची टीका देखील या नगरसेवकांनी केली. दरम्यान यावर आता उत्तर देण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी उद्या (ता. १०) पत्रकार परिषद बोलावली आहे. (Shivsena UBT)

उद्धव ठाकरे यांच्या सेनेतील विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर व प्राची आल्हाट या ५ माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. पक्षाचे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुष्कर तुळजापूरकर, मंदार बलकवडे, राजाभाऊ शेंडगे यावेळी उपस्थित होते.

आमच्या पूर्वीच्या पक्षावर आम्ही कधीच टीका करणार नाही, मात्र त्यांची भूमिका पटली नाही, त्यामुळे पक्षबदल केला असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले. बाळा ओसवाल म्हणाले, २५ वर्षे आम्ही शिवसेनेत होतो. हिंदुत्वाविषयी मी प्रथमपासून आग्रही आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यावेळीच आम्हाला पटले नव्हते. त्यातच दररोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्यामुळे पक्षाबद्दलची नकारात्मकता वाढतच गेली. पुण्यात पक्षवाढीकडे मुंबईतील नेत्यांचे दुर्लक्ष झाले. आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो, मात्र त्याकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. अखेर हा निर्णय घ्यावा लागला. धनवडे यांनीही यावेळी हेच सांगितले. शिवसेनेत असलो तरी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यापासूनच राजकारणाचे धडे घेतले. त्यामुळे भाजप हा काही आमच्यासाठी नवा पक्ष नाही असे ते म्हणाले.

हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय का निवडला नाही यावर बोलताना ओसवाल व धनवडे यांनी व्यक्तीकेंद्रीत पक्ष की राष्ट्रकेंद्रीत पक्ष यात आम्ही भाजपची निवड केली असे सांगितले. भाजपचा नारा राष्ट्र प्रथम असा आहे, आता महापालिकेची उमेदवारी मिळाली नाही तर मग काय करणार? या प्रश्नावर या ५ नगरसेवकांनी आम्ही पक्षादेश प्रमाण मानणारेच आहोत, शिवसेनेत होतो त्यावेळीही तेच केले व आताही तेच करू असे सांगितले.भाजपच्या मुळ कार्यकर्त्यांमध्ये या पक्षप्रवेशामुळे नाराजी आहे याकडे लक्ष वेधल्यानंतर सरचिटणीस पुनीत जोशी यांनी मोठ्या पक्षात अशा लहानलहान गोष्टी होतच असतात, त्यामुळे काही फरक पडणार नाही असे उत्तर दिले. पक्षाच्या वरिष्ठ स्तराने हा निर्णय घेतला, पक्ष कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या निर्णयाबरोबर आहोत असे ते म्हणाले.