Pune Nursing Home | पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नर्सिंग होम ची करणार तपासणी! 

Homeadministrative

Pune Nursing Home | पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नर्सिंग होम ची करणार तपासणी! 

Ganesh Kumar Mule Jan 09, 2025 8:53 PM

Dr Bhagwan Pawar Suspension | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार यांचे निलंबन! | राज्य सरकारकडून कारवाई 
Aapla Dawakhana Yojana PMC Pune | पुणे महापालिका 58 ठिकाणी सुरु करणार ‘आपला दवाखाना’ योजना
Pune Municipal Corporation’s ranking in health schemes has moved from 4th to 3rd

Pune Nursing Home | पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नर्सिंग होम ची करणार तपासणी!

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग (PMC Health Department) शहरातील नर्सिंग होम (Pune Nursing Home) ची तपासणी करणार आहे. तपासणी करणेकरीता क्षेत्रीय कार्यालयस्तरावर क्षेत्रीय वैद्यकिय अधिकारी (Ward Medical Officer) यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे (Dr Nina Borade) आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Suryakant Devkar PMC) यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Pune Municipal Corporation Health Department)

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पीटल्स/नर्सिंग होम्स/रुग्णालये यांना दि बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट १९४९ मधील तरतुदींनुसार रजिस्ट्रेशन देणेत येते. महाराष्ट्र शुश्रुषागृहे नोंदणी नियम २०२१ शासन अधिसुचनेनुसार नर्सिंग होम ची वर्षातुन दोन वेळा म्हणजेच दर सहा महिन्यातुन एकदा तपासणी करण्यात येते. या करीता तपासणीसुची तयार करण्यात आलेली आहे. तपासणी करणेकरीता क्षेत्रीय कार्यालयस्तरावर क्षेत्रीय वैद्यकिय अधिकारी यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. क्षेत्रीय वैद्यकिय अधिकारी यांना तपासणी करतेवेळी आढळुन आलेल्यात्रुटीबाबत संबधिताना तोंडी अथवा लेखी सुचना करण्यात येतात.

तथापी महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम अंर्तगत नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी करणे बाबत उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांनी दिलेल्या सुचना व आदेशानुसार पुणे मनपा कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी विशेष मोहिम(स्पेशल ड्राईव्ह) राबविण्यात येत आहे. याबाबत सर्व क्षेत्रीय वैद्यकिय अधिकारी यांना तशा सुचना करण्यात आलेल्या आहेत.सदर ड्राईव्ह राबवुन एक महिन्यात सर्व नोंदणीकृत नर्सिंग होमची तपासणी करण्यात येणार असुन सदर तपासणी मध्ये दिलेल्या सुचने प्रमाणे तपासणी करण्यात करण्यात येणार आहे.

यामध्ये अग्निशमन दलाचे ना-हरकत पत्र अद्ययावत आहे अगर कसे ? जैव वैद्यकिय कचरा विल्हेवाट व व्यवस्थापन कशा प्रकारे करण्यात येत आहे. रुग्णहक्क सनद, दरपत्रक व पुणे मनपाचा तक्रार निवारण कक्षाचा टोल फ्री क्रमांक दर्शनी भागात लावण्यात आला आहे अगर कसे? त्याचप्रमाणे महाराष्ट्र शुश्रुषागृहे नोंदणी नियम २०२१ शासन अधिसुचनेनुसार इतर बाबीची तपासणी करण्यात येणार आहे.

तरी सर्व नर्सिंग होम चे व्यवस्थापक/संचालक यांना सुचित करण्यात आले आहे की, याबाबत पुणे मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करावे. असे आवाहन डॉ. निना बोराडे, आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका व डॉ. सुर्यकांत देवकर सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0