Vijaystambh Suvidha App | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप!

Homeadministrative

Vijaystambh Suvidha App | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप!

Ganesh Kumar Mule Dec 30, 2024 9:42 PM

Pune Municipal Corporation Employees | पुणे महापालिकेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना कामकाजाचे प्रशिक्षण बंधनकारक 
PMC Election 2025 | प्रारूप प्रभाग रचना : निमित्त महापालिका निवडणूक; वेध मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचे! 
Property Tax | PMC | 40% सवलत कायम ठेऊन आणि 3 पट शास्ती माफ करून देवेंद्र फडणवीस पुणेकरांची मने जिंकणार का?

Vijaystambh Suvidha App | विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप!

| ॲपच्या माध्यमातून सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार

 

Vijaystambh Abhiwadan Sohala – (The Karbhari News Service) – पेरणे फाटा येथे १ जानेवारी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तेथील सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ‘विजयस्तंभ सुविधा’ उपयोजक (ॲप) तयार केले असून त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. २८) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपचा उपयोग करुन अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. (Perane Phata)

पेरणे येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी येत असतात. शासनाच्यावतीने त्यांना बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचे पाणी, पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधांपर्यंत अनुयायांना लवकरात लवकर पोहोचता यावे व त्यांचा लाभ घेता यावा यासाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार करण्यात आले आहे.

हे ॲप https://initiatorstechnology.com/VijayStambhSuvidha.apk या लिंकवरून डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे. या ॲपमध्ये अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधांचे गुगल लोकेशन मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे ॲपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक त्या सुविधा निवडल्यास त्या सुविधेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुगल मॅपवर दिसतो व अनुयायांना इच्छित सुविधेपर्यंत पोहोचणे सोपे जाते, अशीही माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली.
——–

विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी

: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी विजयस्तंभाचे सुशोभीकरण, गर्दी व्यवस्थापन, रांगा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केलेले नियोजन, आजूबाजूच्या जागेचे सपाटीकरण तसेच उभारण्यात येत असलेली शौचालये, उभारलेले पेंडाल, पोलीस सूचना मनोरे आदींच्या उभारणीची तयारी आदीची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या. उपस्थित विविध संघटनांचे प्रतिनिधींशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.