PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले ओळखपत्र!   |  महापालिका सुरक्षा विभागाचा पुढाकार

Homeadministrative

PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले ओळखपत्र! |  महापालिका सुरक्षा विभागाचा पुढाकार

Ganesh Kumar Mule Oct 11, 2024 8:53 PM

Capital value based tax system | भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा अभ्यास महापालिकेने थांबवला!
7th Pay commission DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली   | त्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार, हे आता निश्चित 
Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme | नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात

PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले ओळखपत्र!

|  महापालिका सुरक्षा विभागाचा पुढाकार

 

PMC Primary Education Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) वतीने मतिमंद प्रवर्गातील मुलांसाठी विशेष शाळा (PMC Special School) चालवली जाते. मात्र नुकतेच विशेष मुले हरवत असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्याची मागणी शाळेने केली होती.  ओळखपत्र देण्याचा निर्णय बाबत सुरक्षा विभागाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार आज या विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. अशी माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली. (Pune PMC News)

प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगपालिका संचालित विशेष मुलांची शाळा (मतिमंद प्रवर्ग), मनपाशाळा क्र.१४ बी, शिवाजीनगर गावठाण, पुणे-०५ येथे सुरु असून या शाळेत पुणे शहराच्या विविध भागातून व सामान्य कुटुंबातून विशेष विद्यार्थी येत असतात. यामध्ये ऑटीस्टिक, सेरेबल पाल्सी, अतिचंचल, मतिमंद, स्लोलर्नर, डाऊन सिंड्रोम या विविध प्रकारातील विद्यार्थी येत असतात. सध्या शाळेचा पट 51 असून साधारण २५ ते ३० विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित असतात. (PMC Schools)

काही विद्यार्थी एका जागेवर स्थिर बसत नाहीत, वर्गातून बाहेर पळणे, वर्गातील वस्तू फेकणे, इतरांना मारहाण करणे अशा समस्या या विद्यार्थ्यामध्ये असतात.  तसेच नुकतेच विद्यार्थी हरवत असल्याची घटना देखील समोर आली. यात पालकांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागतो. जर संबंधित विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र असते तर त्यांना संबंधित शाळेत किंवा घरी पोचवणे सोपे झाले असते. त्यामुळे शाळेने ओळखपत्र देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. खासकरून यात सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्याची जबाबदारी घेतली होती. त्यानुसार आज ओळखपत्र देण्यात आली आहेत. यामुळे शाळा प्रशासन आणि विद्यार्थी देखील समाधानी झालेले पाहायला मिळाले.

सुरक्षा विभागाच्या सहकार्याने आमच्या शाळेतील विशेष मुलांना ओळखपत्र मिळाली आहेत. याबाबत आम्ही प्रशासनाचे आभार मानतो. या ओळखपत्रामुळे शाळेबरोबरच पालकांना देखील सहायता होणार आहे.

वर्षा काळे, विशेष शिक्षिका. —-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0