7th Pay Commission | PMPML | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता खात्यात जमा | प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाठपुराव्याला यश

Homeadministrative

7th Pay Commission | PMPML | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता खात्यात जमा | प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाठपुराव्याला यश

Ganesh Kumar Mule Oct 08, 2024 9:54 PM

Devendra Fadnavis | कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Maharashtra News | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 1 लाखाच्या मदतीची कार्यवाही सुरु
Dr Kailas Kadam | महाभ्रष्ट सरकारचा तीव्र निषेध – डॉ. कैलास कदम  | युती सरकारच्या विरोधात काँग्रेसचे पिंपरीत ‘चिखल फेको’ आंदोलन

7th Pay Commission | PMPML | पीएमपीच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता खात्यात जमा | प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाठपुराव्याला यश

| कर्मचाऱ्यांनी भानगिरे यांचे मानले आभार | कर्मचारी करणार भानगिरे यांचा सत्कार

 

PMPML Employees – (The Karbhari News Service) – पीएमपीच्या कर्मचाऱ्यांसाठी नवरात्र उत्सव चांगली बातमी घेऊन आला आहे. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता खात्यात जमा झाला आहे. उचल म्हणून ८४ कोटी पीएमपीला देण्याच्या प्रस्तावाला महापालिका स्थायी समिती व मुख्य सभेने नुकतीच मान्यता दिली होती.  त्यानुसार हा निधी वर्ग करण्यात आला होता. यामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली साजरी होणार आहे. दरम्यान शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) हे सातत्याने याबाबत पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पीएमपी कर्मचाऱ्यांनी भानगिरे यांचे आभार मानले आहेत.

शासन निर्णयानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळास (PMPML) सन २०१३-१४ या वर्षापासून संचलन तुटीची पुणे महानगरपालिकेच्या हिश्श्याची (६०) रक्कम समान मासिक हप्त्यात प्रतिमहा अदा केली जाते. पुणे महानगर परिवहन महामंडळास (PMPML) सन २०२३-२४ या वर्षातील अंदाजित संचलन तुट ७३४.०३ कोटी ग्राह्य धरली असता सन २०२३-२४ या वर्षातील संचलन तुटी पोटी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पुणे महानगरपालिकेच्या स्वामित्व हिश्श्यानुसार (६०%) संचलन तुटी पोटी देय होणारी अंदाजित रक्कम ४४०.४२ कोटी इतकी होत असल्याचे PMPML संस्थेकडून कळविण्यात आलेले होते.

PMPML संस्थेस सन २०२३-२४ मध्ये उचल स्वरुपात आदा करण्यात आलेले ३० कोटी समायोजित करण्यात आलेले आहेत. सन २०२४- २५ मध्ये माहे एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ प्रतिमाह रक्कम ३४ कोटी याप्रमाणे रक्कम २०४ कोटी असे एकूण २३४ कोटी पुणे महानगरपालिकेकडून PMPML संस्थेस संचलन तुटीपोटी आदा करण्यात आलेले आहेत.

दरम्यान अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालीआयुक्त पुणे महानगरपालिका व आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांचे समवेत तसेच कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित असलेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (PMPML) सेवकांना सातवा वेतन आयोग फरक रक्कम ४ हप्त्यात आदा करणेबाबत निर्णय झालेला असून त्यास अनुसरून PMPML कडील सेवकांची (दि.०१/०४/२०१७ ते दि.३०/११/२०२२) ६८ महिन्यांची सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम सुमारे ५६१ कोटी होत आहे त्यानुसार प्रथम हप्ता १४० कोटी पैकी पुणे महानगरपालिकेच्या स्वामित्वानुसार ८४.१५ कोटी होत होती.

PMPML कडील सातवा वेतन आयोग फरक प्रथम हप्ता तातडीने आदा करणेकामी नियमित संचलन तूट व्यतिरिक्त ८४.१५ कोटी अग्रिम स्वरुपात चालू आर्थिक वर्षात पुणे महानगरपालिकेकडून PMPML संस्थेस मिळण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रशासनाने  प्रस्ताव ठेवला होता. त्याला नुकतीच मान्यता देण्यात आली. त्यानुसार पीएमपी प्रशासनाकडे निधी वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा करण्यात आला आहे.

दरम्यान हर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे हे सातत्याने याबाबत पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पीएमपी कर्मचाऱ्यांनी भानगिरे यांचे आभार मानले आहेत. तसेच पीएमपी कर्मचारी हे भानगिरे यांचा याबाबत भव्य सत्कार करणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0