PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना | आतापर्यंत ४५६९ अर्ज महापालिकेकडे प्राप्त | ३० सप्टेंबर पर्यंत करू शकता अर्ज
PMC Social Development Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. ३० सप्टेंबर या कालावधी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. दरम्यान आतापर्यंत दोन्ही योजनासाठी ४५६९ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये १० वी च्या योजनेसाठी ३७१८ तर १२ वी च्या योजनेसाठी ८५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागा यांच्या वतीने देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
दरम्यान चालू आर्थिक वर्षात या योजनासाठी अर्थसंकल्पात २१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
– या आहेत अटी
खुल्या गटातील विद्यार्थ्यांना २०२४ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी / इ. १२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी/ रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थी यांनी किमान ७०%
आणि ४०% दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना / कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक आहे.
शैक्षणिक अर्थसाहाय्य हे इ. १० / १२ वी नंतर शासनमान्य / विद्यापीठमान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्यासच मिळेल.
– काय आहेत योजना
पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वीउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे.
– अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणेकरिता सूचना
१. लाभार्थ्याने यापूर्वी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केले असल्यास त्याच user id व password ने अर्ज भरावा. नवीन लाभार्थ्यांनी नागरिक login द्वारे नवीन रजिस्ट्रेशन करून user id व password च्या आधारे अर्ज भरावा.
२. मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांनी मागासवर्गीय कल्याणकारी योजना व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी युवक कल्याणकारी योजने अंतर्गत अर्ज भरणे आवश्यक आहे.
३. अर्ज पालकांच्या नावे भरणे आहे.
४. संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार मूळ (Original) कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे
आवश्यक आहे.
६. dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेबाबतचा नमुना (हमीपत्र) उपलब्ध करून देणेत आला आहे. त्यानुसार माहिती पालक व महाविद्यालयांनी भरल्यानंतरच सदरचे हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
६. लाभार्थी CBSE/ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळा / महाविद्यालयाकडून टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
७. शैक्षणिक अर्थसाहाय्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
८. अटी व नियमांप्रमाणे भरलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. तसेच नाकारणेत आलेल्या अर्जाबाबत अर्जदाराने दिलेल्या मुदतीमध्ये आक्षेप पूर्तता केल्यास सदर अर्जावर पुढील कार्यवाही केली जाईल. मुदतीमध्ये आक्षेप पूर्तता न केल्यास अर्ज पूर्णतः रद्द करणेत येईल.
९. अर्ज भरताना अर्जदाराने अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवल्यास व सदरचा अर्ज सादर (Submit)
न केल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची राहील.
१०. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर अर्जाबाबतची सद्यस्थिती लॉगिनद्वारे जाणून घेण्याची जबाबदारी नागरिकांची राहील.
११. तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये असलेल्या समाज विकास विभागाकडील कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधावा.
योजनेबाबतचा संपूर्ण तपशील तसेच अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या abt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS