Traffic problem in Kothrud : Youth NCP : कोथरूड मधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादी चे पोलिसांना साकडे

HomeपुणेBreaking News

Traffic problem in Kothrud : Youth NCP : कोथरूड मधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादी चे पोलिसांना साकडे

Ganesh Kumar Mule Mar 26, 2022 8:15 AM

Deepak Mankar News | दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त 6 मे ला नोकरी महोत्सवाचे आयोजन | गिरीश गिरनानी व सनी मानकर यांचा पुढाकार
Girish Gurnani | अखेर केंद्र सरकारला शहाणपण सुचले | गिरीश गुरनानी
Sign Campaign | Manipur Violence | मणिपूर हिंसाचारात महिलांवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार कोण?? | एक सही संतापाची मोहीमेला सर्व पक्षीयांची उपस्थिती

कोथरूड मधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादी चे पोलिसांना साकडे

पुणे : कोथरूड मधील गुजरात कॉलोनी व आझाद नगर परिसरातील रहिवासी व व्यापारी यांच्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने पुढाकार घेतला. वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादीने  पोलिसांना साकडे घातले असून समस्या सोडवण्याची मागणी करण्यात  आली आहे.

अनियंत्रित आणि अनियमित वाहतुकी बद्दलच्या तक्रारी येथील रहिवासी यांनी कोथरूड युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांच्या कडे मांडल्या होत्या. नो पार्किंग मध्ये गाड्या लावणे, पी १, पी २ चे आखलेल्या धोरणानुसार पालन न करणे, रस्त्याच्या कडेलाच चार चाकी गाड्या लावून खरेदी साठी दुकान मध्ये जाणे अश्या अनेक चिंता व त्या मुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील लोकांनी शेवटी युवक राष्ट्रवादी कडे धाव घेतली. या बाबींमुळे पादचाऱ्यांना अतोनात त्रास तर सहन करावाच लागतो पण त्याचसोबत त्यांच्या असुरक्षिततेची टांगती तलवार ही असते. असे या लोकांनी आज गुरूनानी यांना सांगितले. या समस्यांवर त्वरित उपाय म्हणून आज कोथरूड वाहतूक पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांची भेट घेऊन गुरूनानी यांनी निवेदन दिले.

पायगुडे यांनी तत्काळ कारवाई करण्याची हमी यावेळी युवक राष्ट्रवादी व कोथरूड वासियांना दिलेली आहे. या वेळी माध्यमांशी बोलत असताना गुरूनानी म्हणाले “पोलिसांनी आम्हाला ही समस्या त्वरित सोडवण्याची हमी दिलेली आहे आणि मी आशा करतो की तसेच होईल व या परिसरातील अनियंत्रित वाहतुकीची कोंडी सुटून येथील रस्ता व पादचाऱ्यांबरोबरच येथील रहिवासी व व्यापारी देखील मोकळा श्वास घेऊन येथे वावरू शकतील.”