Pune Rain | PMC Pune | पुणे महापालिकेने उपाययोजना करूनही रस्त्यावर पाणी साचते; म्हणजे हा दोष पाण्याचाच!

HomeपुणेBreaking News

Pune Rain | PMC Pune | पुणे महापालिकेने उपाययोजना करूनही रस्त्यावर पाणी साचते; म्हणजे हा दोष पाण्याचाच!

गणेश मुळे Jul 09, 2024 6:35 AM

Pune PMC News | महापालिका आयुक्त यांच्या हस्ते रस्ते दत्तक योजनेचे उद्घाटन 
PMC Road Department | डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर ३ दिवसांत खोदाई
PMC Book of School Student Travel Scheme | पुणे महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थी प्रवास योजना उपक्रमाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन 

Pune Rain | PMC Pune | पुणे महापालिकेने उपाययोजना करूनही रस्त्यावर पाणी साचते; म्हणजे हा दोष पाण्याचाच!

| विवेक वेलणकर यांची महापालिकेच्या कारभारावर विडंबनात्मक टीका

PMC Road Department – (The Karbhari News Service) – पुणे शहरात काल रात्रीच्या थोड्याशा पावसात रस्त्यावर तळी साचली होती. पाणी साचू नये म्हणून पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) केलेल्या उपाययोजना पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. मात्र उपाययोजना करूनही पाणी साचते हा दोष पाण्याचाच आहे. अशी विडंबनात्मक टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी महापालिकेच्या कारभारावर केली आहे. (Pune Rain News)
 वेलणकर यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेने रस्त्यावर  पाणी साचू नये म्हणून स्पॉट शोधून उपाययोजना केल्याचे सांगितले. त्याअंतर्गत म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानच्या डी पी रोडवर फूटपाथ खणून त्यात पाईप टाकून ते पावसाळी गटाराला जोडले. काम सुरू असतानाच जागेवर अभियंत्यांना भेटून हे पैसे पाण्यात जातील असे सांगितले होते. काल रात्री झालेल्या थोड्याशा पावसात  या रस्त्यावर साचलेल्या पाण्याला ते पाईप आणि चेंबर दिसले नाहीत. आणि ते त्या पाईपच्या आणि चेंबरच्या बाजूला साचून राहिले.
वेलणकर पुढे म्हणाले, अर्थातच यात दोष नि:संशयपणे पाण्याचाच आहे. नवसह्याद्री पोस्ट ऑफिस समोरच्या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्या रस्त्यावर पावसाळी गटारे आहेत. पण रस्त्याचा उतार आणि पावसाळी गटारांची झाकणे यांच्या पातळीत फरक असल्याने त्या झाकणाभोवती पाणी साचून राहिले आहे. अर्थातच हा दोष नि:संशयपणे पाण्याचाच आहे. पाणी साचू नये म्हणून आपल्या रस्ते विभागाने केलेल्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असाही टोला वेलणकर यांनी लगावला आहे.
—–