Property tax Amnesty Scheme | चालू आर्थिक वर्षात मिळकत कराबाबत अभय योजना राबविण्याची मागणी   | माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ आणि दीपाली धुमाळ यांची मागणी

HomeBreaking Newsपुणे

Property tax Amnesty Scheme | चालू आर्थिक वर्षात मिळकत कराबाबत अभय योजना राबविण्याची मागणी | माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ आणि दीपाली धुमाळ यांची मागणी

गणेश मुळे Jul 08, 2024 4:29 PM

Deepali Dhumal : समाविष्ट 23 गावातील कर्मचारी 4 महिन्यापासून वेतनाविना
PMC Primary Éducation Department | वारजे माळवाडीतील बराटे शाळेत 13-14 शिक्षक कमी | पालकांकडून आंदोलनाचा इशारा
PMC : Education Board employee : Bonus : शिक्षण मंडळाकडील रोजंदारी सेवकांना  मिळणार बोनस 

Property tax Amnesty Scheme | चालू आर्थिक वर्षात मिळकत कराबाबत अभय योजना राबविण्याची मागणी

| माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ आणि दीपाली धुमाळ यांची मागणी

Pune Property tax  – (The Karbhari News Service) – चालू आर्थिक वर्षात मिळकत कराबाबत पुणे शहरात अभय योजना  राबविण्याची मागणी  माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ (Pradeep Dhumal) आणि दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Buosale IAS) यांच्याकडे केली आहे. (PMC Property tax Department)

धुमाळ यांनी दिलेल्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत असलेले प्रमुख खाते हे कर आकारणी व कर संकलन आहे . पुणे महापालिका हद्दीतील सर्वसामान्य मिळकतदाराची आर्थिक परिस्थिती कोरोना साथीच्या आजारानंतर हळुहळु पुर्व पदावर येऊ लागली असतानाच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या कर आकारणी व कर संकलन विभाग तसेच गवनी विभागाकडून मिळकत कराची दरमहिना दंड लागून गेलेली भरमसाठ बिले मिळकतदारास मिळत असुन संपूर्ण शहरातील थकीत मिळकतदार आमच्याकडे बिलातील दंड माफ करणेसाठी अभय योजना राबविण्याबाबत पाठपुरावा करीत आहेत.
धुमाळ यांनी पुढे म्हटले आहे कि, 2021-22 व 22-23 मध्ये कोरोना महामारी नंतर 2 वेळा अभय योजना राबविली होती यावेळी अनेकांनी मिळकत कर भरला होता. परंतु त्यावेळी अभय योजनेचा लाभ घ्यायचा असूनही कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य मिळकतदाराची आर्थिक परिस्थिती नसल्याने नागरिकांना त्याचा लाभ घेता आला नाही. सदर अभय योजना कोरोना काळात बंद होती. ही अभय योजना लागु केल्यास पुणे मनपाचे आर्थिक उत्पन्नात मोठया प्रमाणात वाढ होईल व विकासकामांना अधिक गती प्राप्त होईल. मिळकत कराची अभय योजना राबविणे बाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने त्याबाबत लोकप्रतिनिधी यांना निर्णय घेता येत नाही. तरी संपूर्ण पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य निवासी, बिगरनिवासी व  मिळकतदाराचे वतीने कर आकारणी व गवनी या दोन्ही विभागाची अभय योजना आपले स्तरावरून आवश्यक मंजुरी घेऊन त्वरित लागु करावी. अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.