PMC Night Shelter | पावसाळ्यात बेघरांनी महापालिकेच्या निवारा प्रकल्पाचा आश्रय घेण्याचे महापालिका समाज विकास विभागाचे आवाहन
PMC Social Development Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरात बेघर लोकांसाठी चार ठिकाणी निवारा प्रकल्प (PMC Night Shelter) उभे केले आहेत. पावसाळ्यात बेघरांना आश्रयाची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे अशा गरजू लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन उपायुक्त नितीन उदास (Nitin Udas PMC) यांनी केले आहे. (Pune PMC SDD)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी दिलेल्या आदेशानुसार पाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये एक लाख लोकसंख्येस एक याप्रमाणे रात्र निवारा (नाईट शेल्टर) प्रकल्प उभारणेत यावे असा निर्णय देण्यात आलेला आहे. महापालिका आयुक्त यांनी याबाबत मुख्य सचिव यांचेकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. (Pune PMC News)
पुणे शहराची लोकसंख्या ३८ लाख गृहित धरून शासनाने पुणे शहरामध्ये ३८ ठिकाणी नाईट शेल्टर प्रकल्प राबविणेबाबत कळविले आहे. या अनुषंगाने शासनाने दिलेले आदेश व मार्गदर्शक तत्वानुसार शहरातील बेघर व निराश्रीत लोकांसाठी निवाऱ्याची सोय नाईट शेल्टर प्रकल्पाद्वारे करणे कामी पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुणे शहरात दिवस-रात्र निवारा प्रकल्प राबविणेत येत आहे. सध्या पुणे शहरात ४ ठिकाणी रात्र निवारा प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत.
या ठिकाणी आहेत दिवस-रात्र निवारा प्रकल्प
1. संस्था – जॉन पॉल स्लम डेव्ह प्रोजेक्ट एम- ३९/१६३९महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे | ठिकाण – मदर तेरेसा हॉल गाडीतळ, येरवडा क्षेत्रिय कार्यालय समोर, पुणे | क्षमता – पुरुष 26
2. संस्था – अक्षरसृष्टी ग्रंथालय बंटर हायस्कुलजवळ, हडपसर, पुणे – २८ – ठिकाण : सेनादत्त सांस्कृतिक हॉल, सेनादत्त पेठ, सेनादत्त पोलिस चौकी मागे, पुणे -३० | क्षमता – स्त्री 20: पुरुष 42
3. संस्था : जान्हवी फौंडेशन स.नं. ५१/१/३३ गांगुर्डेनगर, गुरव पिंपळ, पुणे – २७ : ठिकाण – दुधभट्टी केळभट्टी समाज मंदीर, बोपोडी, रेल्वे फाटक जवळ, पुणे | क्षमता – पुरुष -21
4. संस्था : ओ.बी.सी. सेवा संघ, स.नं. १२९/ब स.नं. २५ डॉ. बाबासाहेब आंबेडक र चौक, बोपोडी,पुणे | ठिकाण : मोलेदिना वाहनतळ पार्किंग प्लाझा, पुणे स्टेशन, पुणे – ३० : क्षमता – स्त्री 22: पुरुष 25.