Manohar Bhide | मनोहर भिडेंना अटक करा | महिलांचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

HomeBreaking Newsपुणे

Manohar Bhide | मनोहर भिडेंना अटक करा | महिलांचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

गणेश मुळे Jul 03, 2024 8:27 AM

PMC Sky Sign Department | पुणे महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जाहिरातींसाठी ३८० जागा!
Buying gold on Dhanteras |  धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा | फसवणूक होणार नाही
Shasan Aapalya Dari | शासन आपल्या दारी कार्यक्रमात  पुणे जिल्ह्यातील २२ लाख नागरिकांना लाभ

Manohar Bhide | मनोहर भिडेंना अटक करा | महिलांचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

NCP – Sharadchandra Pawar – (The Karbhari News Service) – मनोहर भिडे व सरकार यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई पुतळा, संभाजी उद्यान चौक, जंगली महाराज रस्ता येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. (Pune Agitation)

याबाबत शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, मनोहर भिडे नावाचा विकृत मनुवादी माणूस महिलांना नेहमी दुय्यम समजून महिलांनी कसा पेहराव केला पाहिजे याचं ज्ञान देत असतात. आता नुकतेच जीन्स घालणाऱ्या, महिलांनी नटिंनी वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करू नये. अशी मुक्ताफळे उधळली.

आपल्या महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचारांचा शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. राजमाता माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या रणरागिणीणींनी स्वकर्तुत्वाने इतिहास रचला.

अशा कर्तृत्ववान महिलांचा वारसा जपणाऱ्या महिलांचा मनोहर भिडे नामक मनुवादी विकृताने अपमान केला. सध्या राज्यात असलेले मनुवादी सरकार हे मनोहर भिडे सारख्या विकृत मानसिकतेला नेहमीच अभय देत आले आहे. असे ही जगताप म्हणाले.

“मनुवादी किडे मनोहर भिडे, मनुवादी सरकार मुर्दाबाद, मनोहर भिडे मुर्दाबाद, मी सावित्रीची वारसदार करते भिडेचा धिक्कार, मी जिजाऊंची वारसदार करते भिडेचा धिक्कार” अशा घोषणांनी संपूर्ण शिवाजीनगर परिसर दुमदुमला होता.

या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात किशोर कांबळे, मृणालिनीताई वाणी, रुपालीताई शेलार, दिलशादताई आत्तार, स्वप्नील जोशी, केतन ओरसे, राजेश आरने, संजय दामोदरे, प्रविण आल्हाट, तनया साळुंखे, भाई कात्रे, हेमंत बधे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, गणेश नलावडे, पूजा काटकर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.