PMC Property Tax PT 3 Application | | प्रॉपर्टी टॅक्स विभागला मिळाले 375 अतिरिक्त कर्मचारी! | शहरातील 3 लाख 72 हजार मिळकतींचा केला जाणार सर्वे!

HomeBreaking Newsपुणे

PMC Property Tax PT 3 Application | | प्रॉपर्टी टॅक्स विभागला मिळाले 375 अतिरिक्त कर्मचारी! | शहरातील 3 लाख 72 हजार मिळकतींचा केला जाणार सर्वे!

गणेश मुळे Jun 22, 2024 8:04 AM

Pune Property tax | उद्यापासून थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव्र मोहीम | उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु! 
 How to Pay Pune Property tax Online | पुण्यात तुमचा मिळकत कर ऑनलाइन कसा भरावा? जाणून घ्या अधिकृत पोर्टल, पेमेंट करण्याची पद्धत आणि सर्व काही! 
Pune Property Tax | पुणेकरांना PT 3 अर्ज भरण्यासाठी महापालिका ऑनलाईन सुविधा उपलब्ध करणार | उपायुक्त माधव जगताप यांचे आश्वासन

PMC Property Tax PT 3 Application | | प्रॉपर्टी टॅक्स विभागला मिळाले 375 अतिरिक्त कर्मचारी!

| शहरातील 3 लाख 72 हजार मिळकतींचा केला जाणार सर्वे!

PMC Property tax Department- (The Karbhari News Service) – पुणे शहरातील स्व-वापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात 40% सवलतीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) प्रायोगिक तत्वावर तपासणी मोहीम सुरु करण्यात आली होती. त्याचा आधार घेऊन आता संपूर्ण शहरात ही मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे 3 लाख 72 हजार मिळकतींचा सर्वे केला जाणार आहे. त्यासाठी विभागाने अतिरिक्त 500 कर्मचारी देण्याची मागणी सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती. त्यानुसार अतिरिक्त 375 कर्मचारी विभागाला मिळाले  आहेत. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांच्याकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. (PMC Property tax Department)

2024-25 या आर्थिक वर्षातील देयके वितरीत केल्यानंतर PT-3 फॉर्म भरण्याची मुदत वाढविण्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी मागणी करीत होते. अशा 3,72,440 मिळकतींचा सर्व्हे पुणे महानगरपालिकेच्या सेवकांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करण्याचे काम मंगळवार  पासून चालू केले आहे.
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्व-वापराच्या निवासी मिळकतीस 40% सवलतीच्या अनुषंगाने वडगाव धायरी, वडगाव बुद्रुक व हिंगणे या भागात प्रायोगिक तत्वावर 6 मे पासून भेट देण्यात आली होती. मिळकतधारक स्वतः राहत असल्यास, त्यांचेकडून 40%  सवलतीचा PT-3 form नागरिकांना हस्तांतरित करण्यात आला.  मिळकतधारक स्वतः राहत असल्यास, याबाबत मिळकतधारकांनी PT 3 form भरताना सादर केलेल्या कागद पत्रानुसार तपासणी करण्यात येत होती.
याचाच आधार घेऊन आता पुणे महापालिका पूर्ण शहरभर ही तपासणी मोहीम राबवणार आहे. यात नागरिकांकडून तात्काळ PT 3 भरून घेण्यात येणार आहे. घरात स्वतः राहत असल्यासच मिळकतधारकाला सवलत मिळणार आहे. नागरिकांसाठी ही शेवटची सवलत असणार आहे. यानंतर PT 3 form भरण्याची संधी दिली जाणार नाही. मिळकतींची संख्या मोठी असल्याने आणि महिनाभरात हे काम पूर्ण करायचे उद्दीष्ट ठेवल्याने मिळकत कर विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज होती. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी अतिक्रमण विभागाकडील ७५ सहाय्यक निरीक्षक, घन कचरा व्यवस्थापन विभागाकडील १५० आरोग्य निरीक्षक, पंधरा क्षेत्रिय कार्यालयातील प्रत्येकी पाच असे ७५ मोकादम आणि अन्य विभागातील ७५ टंक लिपिक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणाचे काम पुर्ण होईपर्यंत हे मनुष्यबळ कर आकारणी विभागाशी संलग्न राहाणार असून त्यांवर केवळ सर्वेक्षणाची जबाबदारी राहाणार आहे. त्यांना कर वसुलीचे कुठलेही अधिकार राहाणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. चोवीस जूनपासून हे अतिरिक्त मनुष्यबळ सर्वेक्षणाचे काम सुरू करणार आहे.

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतील ज्या मिळकतींची 40% सवलत जी. आय. एस. सर्व्हे अंतर्गत 1 एप्रिल 2018 पासून रद्द करण्यात आली. तसेच ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी 40% सवलत न देता 1 एप्रिल 2019 पासून पुढे झालेली आहे, अशा मिळकतींधारकांसाठी पुणे महानगरपालिने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यातील सगळ्यात महत्वपूर्ण निर्णय हा आहे कि, PT-3 अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.