Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1068 कोटींचे उत्पन्न 

HomeBreaking Newsपुणे

Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1068 कोटींचे उत्पन्न 

गणेश मुळे May 31, 2024 2:59 PM

Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1330 कोटींचे उत्पन्न | 68% लोकांनी ऑनलाईन पद्धतीचा केला उपयोग
  15 days extension for citizens to pay property tax at discount!  |   Decision of PMC Property Tax Department
 PT-3 application deadline extended till 15th August |  PMC took important decisions regarding 40% discount

Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1068 कोटींचे उत्पन्न

PMC Pune Property Tax – (The Karbhari News Service) – प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेला 31 मे पर्यंत सुमारे 1068 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली. (Pune  Municipal Corporation Property tax Department)
पुणे महापालिकेकडून वसुलीवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल म्हणजेच आर्थिक वर्ष सुरु झाल्यापासूनच वसुली सुरु झाली होती. पहिल्या दिन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना 5-10% सूट दिली जाते. दरम्यान 31 मे पर्यंत महापालिकेला 1068 कोटी 28 लाख एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे. 31 मे या दिवशी 49 कोटी 23 लाख मिळाले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

| 15 जून पर्यंत मुदतवाढ

दरम्यान आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत  मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये ५% व १०% इतकी सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी नागरिकांकडे अवघा 1 दिवस उरला आहे. मात्र नागरिकांकडून मुदतवाढ देण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. त्यानुसार नागरिकांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच नागरिक 15 जून पर्यंत मिळकतकर भरून सवलत मिळवू शकतात.