7th Pay Commission Latest News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
| 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!
पुणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना अ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हप्त्याची रक्कम रोखीने अदा करणेस मान्यता प्राप्त झालेली आहे.
| सर्क्युलर मध्ये काय म्हटले आहे?
तिसऱ्या हप्त्याची बिले 27 मे अखेर ऑडीट विभागातून तपासून घ्यायची आहेत. तसेच आयकर कपात करण्याबाबत सुविधा संगणक प्रणाली (व्हर्जन) माहिती तंत्रज्ञान विभागाने प्राप्त करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2024-25 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये यासाठी 40 कोटी आवश्यक तरतूद उपलब्ध असून सदर बिले वरील अर्थशिर्षकावर खर्ची टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 6 व्या वेतन आयोगाच्या वेतन आकारणी व वेतन फरक हप्त्यांची ज्याप्रमाणे नोंदी सेवापुस्तकामध्ये करणेत आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे 7 व्या वेतन आयोगापोटी कर्मचाऱ्यांना अदा केलेल्या हप्त्याची व पुढील मिळणाऱ्या हप्त्याची तसेच, विवरण पत्रातील वेतनासंबंधीची नोंद सेवापुस्तकामध्ये संबंधीत पगार बिल लेखनिकांनी ठेवणे आवश्यक आहे. तरी, सर्व खातेप्रमुख यांनी त्याचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत बिल लेखनिकांना त्या सूचना देण्याची तजवीज करावी. असे देखील वित्त व लेखा विभागाने म्हटले आहे.