Pune Loksabha Election | लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी  | कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

HomeपुणेBreaking News

Pune Loksabha Election | लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी | कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

गणेश मुळे May 11, 2024 11:30 AM

Maval Loksabha | AAP | मावळ लोकसभेची जागा आप पार्टी लढवणार!
Pune Loksabha Eelction 2024 |उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा | मतदान केंद्रांना अडीच हजार मेडीकल कीटचे वितरण
Loksabha Election Holiday | लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी | कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

Pune Loksabha Election | लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी

| कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

 

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) –  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असल्याने या दिवशी संबंधित मतदार संघात सुट्टी असणार आहे. (Pune Loksabha Election 2024)

राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असणार आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर संस्था (प्रतिष्ठान) आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावावे आणि लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.