चार गावांची पाणी योजना महापालिका घेणार ताब्यात
: १४ कोटींचा खर्च अपेक्षित
पुणे : महापालिका हद्दीत शिवणे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर आणि न्यू कोपरे अशा चार गावाचा समावेश झाला आहे. या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या योजनेतून पाणी पुरवठा केला जायचा. मात्र या गावाचा समावेश मनपा हद्दीत झाला असल्याने आता त्या गावाची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे प्राधिकरणा कडील पाणी पुरवठा योजना महापालिका आपल्या ताब्यात घेणार आहे. त्यासाठी महापालिकेला १४ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. या बाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासानाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या मंगळवारच्या बैठकीत चर्चा होईल.
: स्थायी समिती समोर प्रस्ताव
महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार महापालिका हद्दीत २०१७ साली शिवणे आणि उत्तमनगर या दोन गावांचा सामावेश झाला होता. त्यानंतर २०२१ साली कोंढवे धावडे आणि न्यू कोपरे या गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला आहे. या चार ही गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र या गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाला असल्याने आता गावांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार प्राधिकरण सोबत झालेल्या बैठकीत ही पाणी योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा झाली होती. यासाठी महापालिकेला प्राधिकरणास १४ कोटी रुपये देणे अपेक्षित आहे. त्यानंतर हो योजना महापालिकेकडे हस्तांतरित होईल. या बाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासानाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या मंगळवारच्या बैठकीत चर्चा होईल.
COMMENTS