Cervical Cancer Vaccine | PMC Health Department | सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी बाबत राज्य सरकारचाच अडथळा!

HomeपुणेBreaking News

Cervical Cancer Vaccine | PMC Health Department | सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी बाबत राज्य सरकारचाच अडथळा!

गणेश मुळे Apr 20, 2024 2:56 PM

CHS Portal | PMC Health Service | Computerization of CHS! | Mandate to municipal employees to fill information on portal for CHS card
PMC Standing Committee | मनपाच्या माजी-आजी सदस्यांच्या अपत्यांना देखील अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या कक्षेत आणणार
PMC Building Lift | तब्बल 2 तासांनी महापालिका भवनातील लिफ्ट मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका | लिफ्ट च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Cervical Cancer Vaccine | PMC Health Department | सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी बाबत राज्य सरकारचाच अडथळा!

| आता दिले जात आहे आचारसंहितेचे कारण

Cervical Cancer Vaccine | PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Pune Municipal Corporation Health Department) 2500 सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस (Cervical cancer vaccines) खरेदी करण्याबाबत सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.  महापालिका शाळांतील (PMC School) आठवी आणि नववीच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही लस नववीच्या मुलींना दिली जाणार होती. मात्र राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेने पुणे महापालिकेला ही लस खरेदी करता आली नाही. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरच मुलींना ही लस मिळू शकणार आहे. दरम्यान सरकारच्या उदासीनतेने मागील आर्थिक वर्षात तरतूद करून ठेवलेला निधी देखील लॅप्स झाला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

आरोग्य विभागाकडून लस खरेदीसाठी जानेवारी महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी हा निविदा भरण्याचा अंतिम कालावधी होता. ही लस राज्य सरकार कडूनच खरेदी करण्यात येणार होती. दोन वर्षासाठी लस या माध्यमातून घेण्यात येणार होती. मात्र महापालिकेने सगळी प्रक्रिया पूर्ण करून देखील सरकार कडून कसलाही प्रतिसाद देण्यात आला नाही. जेव्हा सरकारला वेळ मिळाला तेव्हा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे सरकार कडून आचारसंहितेचे कारण देत खरेदी प्रक्रिया रखडवून ठेवण्यात आली.  लस खरेदी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीमधील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार होती. पहिल्या टप्प्यात नववीतील आणि त्यानंतर इयत्ता आठवीच्या मुलींनाही लसीकरण करण्यात येणार होते. लस खरेदी झाली असती तर मार्च चा शेवटचा आठवडा किंवा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात हे लसीकरण केले जाणार होते. मात्र आता आचारसंहिता झाल्यानंतरच लस खरेदी करण्यात येणार आहे. म्हणजेच आता नवीन शैक्षणिक वर्षातच मुलींना लस मिळू शकणार आहे. (Pune PMC News)

 

सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? 

मुळात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. पण, हळूहळू शरीरातून पांढरा स्त्राव होणे, योनीमार्गातून दुर्गंधी येणे, लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे यांसारखी लक्षणं असतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो, म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. सर्वायकल कॅन्सर हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. पहिला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि दुसरा म्हणजेच एडेनोकार्सिनोमा.