Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून!    | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 

HomeBreaking Newsपुणे

Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून!   | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 

गणेश मुळे Apr 18, 2024 2:04 PM

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या वाढल्या! देण्यात आले अतिरिक्त पदभार
PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!
Deputy Commissioner Pratibha Patil has additional charge of PMC General Administration Department!

Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून! 

 | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 

 

Maratha Reservation Survey Pune | PMC Officers and Enumerators Payment | पुण्यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) प्रगणकाद्वारे मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.  14 लाख 30 हजार घरांचा सर्वे झाला. मात्र हे काम करणाऱ्या प्रगणक आणि अधिकाऱ्यांना अजून देखील मानधन देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे मानधन अदा करण्यात आले आहे. ते महापालिका तिजोरीत गेली 15 दिवस झाले तसेच पडून आहे. महापालिका निवडणूक विभागाकडून निधी वितरण बाबत उदासीनता का दाखवली जात आहे, याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे. (Maratha Reservation News)

महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे (Maharashtra State Commission for Backward Classes) मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे  काम सोपवले होते. त्यानुसार पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण झाले.  सर्वेक्षण 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या 3 हजाराहून प्रगणकामार्फत (Enumerators) पूर्ण करण्यात  आले.   सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप MSBCC वर livedata entry मार्फत  करण्यात आले. (Pune PMC News)

सर्वेक्षणाचे काम करणारे पर्यवेक्षक (Supervisor) आणि प्रगणक (Enumerator) यांना प्रत्येकी 10 हजार रुपये आणि प्रशिक्षणाकरिता प्रवास भत्ता 500 रुपये अदा करण्यात येणार आहे. हा निधी राज्य मागासवर्ग आयोगाकडून महापालिकेला देण्यात आला आहे. हा निधी वितरित करण्याचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच हा निधी नाही वापरला तर 90 दिवसाच्या आता जमा करावा. असे देखील आयोगाने म्हटले आहे.

सर्वेक्षणाच्या कामासाठी कर्मचारी लवकर घराच्या बाहेर पडत होते तर खूप उशिरा घरी परतत होते. असे असताना देखील कर्मचाऱ्यांना अजून पर्यंत मानधन मिळालेले नाही. विशेष हे आहे कि निधी आलेला असून देखील महापालिका निवडणूक विभागाकडून निधी वितरण बाबत उदासीनता दाखवली जात आहे.

दरम्यान याबाबत निवडणूक विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दिवसभरात त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.