No Water No Vote – पाण्यामुळे नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ देऊ नका
| जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे पुणे महापालिका आयुक्तांना आदेश
No Water No Vote – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या काही भागांत नागरिकांना भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या त्रासाला कंटाळून नागरिक ‘नो वॉटर नो वोट’ अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी गंभीरपणे लक्ष देत पुणे महापालिका आयुक्तांना (Pune Municipal Corporation Commissioner) यात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. (PMC Water Supply Department)
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील खैरेवाडी परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत बॅनर लावले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. (Loksabha Election Voting)
जिल्हाधिकारी कार्यालयाचा निवडणूक विभाग लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि लोकांनी पुढे यावे म्हणून जनजागृती करत आहे. मात्र दुसरीकडे लोक मूलभूत समस्यांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सतर्क झाले आहे. लोकांना बहिष्कार टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी लोकांना पाणी द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ दिवसे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत.