The Art of Thinking Clearly Book | विचार करण्याच्या पद्धती बाबत एक भन्नाट पुस्तक | स्पष्ट विचार करण्याची कला आत्मसात करायची असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं 

HomeBreaking Newssocial

The Art of Thinking Clearly Book | विचार करण्याच्या पद्धती बाबत एक भन्नाट पुस्तक | स्पष्ट विचार करण्याची कला आत्मसात करायची असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं 

गणेश मुळे Mar 24, 2024 7:02 AM

Electric ST Bus | Shivai | ‘शिवाई’ या पहिल्या इलेक्ट्रिक  एसटी बसचे लोकार्पण 
PMC Pune RFD project | चला पुणे महापालिकेचा नदीकाठ सुधारणा प्रकल्प समजून घेऊया!
Pune Akashvani Update | पुणे आकाशवाणी वृत्तविभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती

The Art of Thinking Clearly Book | विचार करण्याच्या पद्धती बाबत एक भन्नाट पुस्तक | स्पष्ट विचार करण्याची कला आत्मसात करायची असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं

The Art of Thinking Clearly Marathi | लेखक रॉल्फ डोबेली यांनी लिहिलेलं The Art of Thinking Clearly हे पुस्तक म्हणजे विचार करण्याच्या पद्धती बाबत एक भन्नाट पुस्तक आहे. याचा मराठी अनुवाद मधुश्री प्रकाशन ने केला आहे. तुम्हांला स्पष्ट विचार करण्याची कला आत्मसात करायची असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं. या पुस्तकाने तुमचे पूर्वग्रह दूर होतील. स्पष्ट विचार करायला मदत होईल.

आपल्या सर्वांच्या मनात आकलनासंबंधी पूर्वग्रह असतात आणि त्याबद्दल आपल्याला अपराधी वाटतं. दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या या साध्या साध्या चुका असतात. त्या चुका कोणत्या आणि त्या कशा ओळखाव्या, हे जाणून घेतलं तर आपण अधिक चांगली निवड करू शकू.

आनंदी आणि अधिक संपन्न जीवन जगायचं असेल तर आपल्याला अधिक चातुर्य, नवीन कल्पकता, झगमगीत गॅझेट्स किंवा अधिक आर्त कृती/घाईगडबड इत्यादींची आवश्यकता नसून थोड्या कमी अतार्किकतेची
गरज आहे, हे आपल्याला ‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली’वरून दिसून येतं.
 साधं, स्पष्ट आणि सतत चकित करणारं हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल आणि तुमच्या निर्णयप्रक्रियेत परिवर्तन घडवून आणेल.
तुम्हाला न आवडणारा सिनेमा तुम्ही का स्वीकारू नये, भविष्याचं भाकित वर्तवणं किती कठीण आहे, तुम्ही बातम्या का पाहू नयेत… अशा अथपासून इतिपर्यंत सर्व कारणांकरिता ‘द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली’
मानवी तर्कामागचं कोडं सोडवते.