Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का? भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs BJP – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरून त्यावर जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा अशा आशयाचा मजकूर टाकून तो प्रसारित केला. याला दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला.
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांच्याच पक्षावर व नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरण्याची वेळ आलेली आहे. यावरून त्यांच्या पराभवाची मानसिकता दिसून येते जर स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर व नेत्यांवर विश्वास असता तर अशा पद्धतीचे बालिश चाळे कार्यकर्त्यांनी व धंगेकरांनी केलेच नसते असा आरोप गौरव बापट यांनी केला.
पुढे ते म्हणाले देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार 100% निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमचे संपूर्ण कुटुंब हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आगामी काळात हिरीरीने सहभाग घेऊन मोहोळ यांना खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असे प्रतिपादन गौरव बापट यांनी केले