PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक जारी !

HomeBreaking Newsपुणे

PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक जारी !

गणेश मुळे Mar 21, 2024 6:35 AM

PMC administration has announced regulations regarding Retired employees Notional increment 
PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून नियमावली जाहीर! 
Retired Employees Notional Increment | 30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ | पुणे महापालिका मागवणार राज्य सरकारचे मार्गदर्शन

PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक जारी!

PMC Retired Employees Notional Increment – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या (Retired Employees) किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ (Notional Increment) विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन (PMC Pension) निश्चित करण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. त्यानुसार पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) हा नियम लागू आहे. यावर अमल करून सेवकांना लाभ देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नियमावली घोषित करण्यात आली आहे. त्याला स्थायी समिती (PMC Standing Committee) आणि मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार वित्त आणि लेखा विभागाकडून यावर अंमलबजावणी करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.   (PMC Retired Employees Notional Increment)

३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा आता होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत  विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवेदने  संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास प्राप्त होत आहेत. तसेच उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेला निर्णय विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सरकारच्या वित्त विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.  नियमावली पुणे महापालिकेस लागू असल्याने ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करणेकरीता खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत यावी. असे परिपत्रकात म्हटले आहे. (Latest News on Notional Increment)

– अशी आहे नियमावली

1.  ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांने त्यास १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारातघेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करणेबाबत वैयक्तीक अर्ज शेवटचे वेतनाचे खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील.एकत्रितपणे केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येऊ नये.
2. जे महापालिका कर्मचारी ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ज्यांनी मागील १२ महिन्यांची अर्हताकारीसेवा केलेली आहे, अशाच सेवानिवृत्त सेवकांना या योजनेचा लाभ देण्यात यावा. अर्हताकारी सेवा म्हणजे महाराष्ट्रनागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ३० ते ५८ नुसार निवृत्तिवेतनासाठी विचारात घेतली जाणारीसेवा होय.
3. अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासन परिपत्रकानुसार व मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या वर नमूद
आदेशात नमूद केलेप्रमाणे संबंधित सेवकाचे सेवानिवृत्तिविषयक लाभ अनुज्ञेय करावेत. सदर लाभ सुधारित करण्यातआल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील ३ वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तिचा दिनांकयापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी.
4. उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्ताचा अर्ज फेटाळण्यातयेऊ नये.
5. सदर खात्याने संबंधित सेवानिवृत्त सेवकांची प्रकरणे माहे जुलै महिन्याची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करून
खातेस्तरावर खात्री करून प्रकरण सेवानिवृत्त सेवकाच्या मूळ अर्जासह पेन्शन विभागामार्फत मुख्य लेखापरिक्षक
विभागाकडे मान्यतेस्तव सादर करणे आवश्यक राहील.
6. सदर लाभ देतेवेळी महापालिकेस येणे रकमा नसलेबाबत खात्री करावी. येणे रकमा असल्यास महाराष्ट्र नागरी सेवानियम (निवृत्तीवेतन), १९८२ मधील नियम १३२ नुसार प्रथमतः उपदानाच्या रकमेतून तसेच आवश्यकतेनुसार नियम१३४, १३४अ नुसार सुधारित निवृत्तिवेतनापोटी देय थकबाकीच्या रकमेतून समायोजित करावयाच्या आहेत.
7.  कार्यवाही करणेकरीता आवश्यक नवीन संगणक प्रणाली अथवा सध्याचे संगणक प्रणालीमध्ये दूरुस्तीमाहिती व तंत्रज्ञान विभागाकडून करणेत यावी.
Pmc circular