PMC Seniority List | विविध संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत भरपूर उणिवा!    | रमेश शेलार यांनी नोंदवला आक्षेप 

HomeBreaking Newsपुणे

PMC Seniority List | विविध संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत भरपूर उणिवा!  | रमेश शेलार यांनी नोंदवला आक्षेप 

गणेश मुळे Mar 20, 2024 12:33 PM

PMC Employees Festival Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचे मुख्य लेखा व वित्त विभागाचे सर्क्युलर जारी
PMC Employees Union Annual Report | पी .एम.सी एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक अहवालचे प्रकाशन! 
PMC Employees : Pension : मनपा निवृत्त कर्मचार्यांना मिळणार तातडीने पेन्शन

PMC Seniority List | विविध संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत भरपूर उणिवा!

| रमेश शेलार यांनी नोंदवला आक्षेप

PMC Seniority List – (The Karbhari News Service) पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation (PMC) आस्थापनेवरील विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवा जेष्ठता यादी सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC General Administration Department) प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र यात भरपूर तांत्रिक चुका करण्यात आल्या आहेत. असा आक्षेप प्रभारी पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) रमेश शेलार (Ramesh Shelar PMC) यांनी घेतला आहे. त्यात तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी शेलार यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे. (Pune PMC News)

महाराष्ट्र शासन राजपत्रातील निर्देश विचारात घेऊन महापालिका आस्थापनेवरील विविध संवर्गातील सेवाज्येष्ठता याद्या सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्या 1 जाने 2024 रोजीच्या स्थितीस अनुसरून अद्ययावत करून अंतिम करायच्या आहेत. त्यासाठी यावर हरकती नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार रमेश शेलार यांनी सेवाज्येष्ठता यादीतील चुका निदर्शनास आणून दिल्या आहेत. (Pune Municipal Corporation Latest News)
शेलार यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तांना दिलेल्या पत्रानुसार यादीत काही चुका व उणिवा प्रकाशित करताना राहिल्या आहेत.
1. नगरसचिव वर्ग १ या विभागात उप नगरसचिव वर्ग २ याचा समावेश नाही.
2. मुख्य विधी अधिकारी वर्ग १ या पदी अधिकारी निवड हि पदोन्नती झालेली आहे; परंतु यादीमध्ये नियुक्तीचा मार्ग सरळसेवेने नमूद केलेला आहे.
3. उपआयुक्त वर्ग १ या पदावरील अधिकारी निवड क्र. १ ते ७ क्षेत्रिय अधिकारी/ सहाय्यक आयुक्त या पदावरून पदोन्नतीने उपआयुक्तपदी झालेली आहे. मात्र यादीमध्ये या संवर्गातील नियुक्तीचा मार्ग सरळसेवा असा नमूद आहे. या संवर्गातील क्र. ८ वरील सेवा सुद्धा निवड पदोन्नतीने झालेली आहे.
नगरसचिव हे पद ०१.०९.२०२० पासून रिक्त आहे. आताचे पद हे महाराष्ट्र महापालिका अधिनियम क्र. ४५(५) अन्वये झालेले नाही.
त्यामुळे प्रकाशित सेवा जेष्ठता यादीमध्ये योग्य ती दुरुस्ती केली जावी. अशी मागणी रमेश शेलार यांनी केली आहे.